एसटीची एसी डबर डेकर स्वप्नच

मुंबई,15 मार्च 2017/AV News Bureau:

प्रवाशांची क्षमता वाढविण्याच्यादृष्टिने एसी डबरडेकर चालविणे तांत्रिक अडचडणींमुळे तसेच प्रवाशांच्या दृष्टिने हिताचे नसल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी लेखी उत्तराद्वारे विधानपरिषदेत सांगितले. त्यामुळे एसटीची एसी डबलडेकर सध्या तरी प्रवाशांसाठी स्वप्नच राहिली आहे.

प्रवाशांची क्षमता वाढविण्याबरोबरच एसटीचा खर्च कमी व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाने दुमजली बस चालविण्याचा निर्णय  डिसेंबर 2016 सुमारास घेतला होता. यासाठी एसी डबल डेकर बस चालविण्यासंदर्भात मुंबई-पुणे या मार्गावर चाचपणीही करण्यात आली होती. परंतु डबल डेकर चालविण्यासंदर्भात काही तांत्रिक व चालविण्याच्यादृष्टीने अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे सद्यस्थितीत वातानकूलित डबलडेकर बस मुंबई-पणे महामार्गावर चालविणे परिवहन मंडळासाठी तसेच प्रवाशांच्याही दृष्टिने हिताचे नसल्याचे रावते यांनी आपल्या उत्तरात नमूद केले आहे. त्यामुळे सध्यातरी एसटीची डबल डेकर बस प्रवाशांसाठी एक स्वप्नच आहे.