ठाण्यात उद्या पाणी पुरवठा बंद

ठाणे,7 सप्टेंबर 2017/AV News Bureau:no-water-supply-in-thane

ठाणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाणी पुरवठा योजनेच्या जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या 8 सप्टेंबर रोजी 24 तास शीळ टाकी येथील पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे.

महाराष्‍ट्र औद्योगिक क्षेत्रातील पाणी पुरवठा योजनेच्‍या 1590 मी.मी. व्‍यासाच्‍या जलवाहिनीच्या अत्‍यावश्यक दुरुस्‍तीचे काम करण्‍यात येणार असल्‍याने 8 सप्टेंबर रोजी  मध्यरात्रीपासून 24 तासासाठी ​शिळ टाकी येथील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या कालावधीत मुंब्रा, दिवा, कळवा, बाळकुम पाडा क्र.1 इत्यादि परिसराचा महाराष्‍ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून होणारा पाणी पुरवठा 24 तास बंद राहणार आहे.no-water-supply-in-thane

या शटडाऊनमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा योग्य तो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने या प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे. no-water-supply-in-thane