विद्यार्थ्यांच्या  कल्पनांना चालना देणारे विज्ञान प्रदर्शन

sci14

नवी मुंबई, 8 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:

सध्याचे युग हे विज्ञान युग असल्याने मुलांमध्ये लहान वयापासूनच विज्ञानाची गोडी वाढीस लागावी याकरीता नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. वाशी से.16. येथील नमुंमपा शाळा क्र.28 मध्ये हे विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

sci13sci15

विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात उत्साहाने मांडलेल्या 177 विज्ञान प्रकल्पांची पाहणी करुन मराठी विज्ञान परिषदेच्या पदाधिका-यांनी पहिली ते पाचवी या एका गटात 5 आणि सहावी ते आठवी या दुस-या गटात 5 अशा एकूण दहा विज्ञानप्रकल्पांची पारिताषिकांसाठी निवड केली.

इयत्ता पहिली ते पाचवीच्या गटात विदयाभवन, नेरुळ शाळेच्या वेदांगी पोखरकर व आदित्य नरवडे या विदयार्थ्यांनी बनविलेल्या टाकाऊपासून टिकाऊ या प्रकल्पास सर्वप्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. ॲव्हलॉन हाईट्स, वाशी शाळेच्या वैभवी अय्यंगार व आरना खैरे या विदयार्थ्यांच्या हायड्रॉलिक मॉडेल या प्रकल्पास व्दितीय क्रमांकाचे तसेच आय.सी.एल मोनामी स्कुल, तुर्भे यांच्या नेहा शिंदे व शुभम चिकणे या विदयार्थ्यांनी तयार केलेल्या सोलरएनर्जी या प्रकल्पास तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. त्याचप्रमाणे किमया भोईर व देविका आपटे या मॉडर्न स्कुल, वाशीच्या विदयार्थ्यांनी तयार केलेल्या कच-यापासून वीज निर्मिती या प्रकल्पास तसेच नमुंमपा शाळा क्र.30, कोपरी यांच्या प्रांजल गर्जे व बालाजी राठोड या विदयार्थ्यांनी तयार केलेल्या विज्ञान खेळणी या प्रकल्पांस दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रदान करण्यात आली.

sci12sci1

इयत्ता सहावी ते आठवीच्या गटात नमुंमपा शाळा क्र.46, गोठिवली शाळेच्या किरण जाधव व विघ्नेश कांदळकर या विदयार्थ्यांनी बनविलेल्या इंधन निर्मिती या प्रकल्पास सर्वप्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. साईहोली फेथ स्कुल कोपरखैरणे शाळेच्या चरण शेट्टी व सुजल वावकर या विदयार्थ्यांच्या शेतकीविषयक प्रयोग या प्रकल्पास व्दितीय क्रमांकाचे तसेच आय.सी.एल स्कुल, वाशी यांच्या अमर कुंभार व रितेश मुदगे या विदयार्थ्यांनी तयारकेलेल्या शाश्वत पर्यावरणासाठी पुनर्वापर या प्रकल्पास तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. त्याचप्रमाणे शेख मुकदुस व शेख फलक या अंजुमन इस्लाम ए.ए. खटखटे स्कुलच्या विदयार्थ्यांनी तयार केलेल्या शेतीविषयक नवीनतंत्रज्ञान या प्रकल्पास तसेच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे विदयामंदिर, बेलापूर यांच्या अंशुमन तिवारी व दिपेश मिश्रा या विदयार्थ्यांनी तयार केलेल्या वायू प्रदुषणाला प्रतिबंध या प्रकल्पास उत्तेजनार्थ पारितोषिके प्रदान करण्यात आली.