प्रचेता सुपल ,अश्विनी खानविलकर नवी मुंबई महापौर चषक गायन स्पर्धेचे विजेते

 नवी मुंबई, 10 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:

नवी मुंबई महपौर चषक नृत्य आणि गायन स्पर्धेत प्रचेता सुपल आणि अश्विनी खानविलकर यांनी प्रथम क्रमांक मिळवत महापौर चषक मिळवला. या स्पर्धेची महाअंतिम फेरी नुकतीच वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे घेण्यात आली.

यावेळी क्रीडा वसांस्कृतिक समितीचे सभापती लिलाधर नाईक व उप सभापतीश्रध्दा गवस, उद्यान व शहर सुशोभिकरण समिती सभापती तनुजा मढवी, नगरसेवक सुनिल पाटील, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, कॉमेडी एक्सप्रेसचेसंगीत संयोजक अमिर हडकर, स्पर्धेच्या संयोजक कलश एंटरटेन्टमेंटच्या प्रमुख अंजना गायकवाड, नृत्य दिग्दर्शक अश्मित कामटे, गायक सायबा, निवेदक किरण पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

अतिरिक्त आयुक्त शहर  अंकुश चव्हाण यांनी नागरी सेवा सुविधांचा दर्जा चांगला राखण्यासोबतच शहराची सांस्कृतिक जडणघडण व्हावी याकरीता नवी मुंबई महानगरपालिका विविध उपक्रम राबवितअसून त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे याबद्दल समाधान व्यक्त केले.

 गायन स्पर्धेचे परीक्षण  पार्श्वगायक फिजा आणि साथीया फेम गुलाम कादीर मुस्तफा खान यांनी केले. त्याचप्रमाणे नृत्य स्पर्धेचे परीक्षण डान्स के सुपरस्टार या झी टिव्हीवरील स्पर्धेचे परीक्षक सुप्रसिध्द नृत्यदिग्दर्शकपॉल सन्स थॉमस यांनी केले.

 गट आणि विजेते

  • 15 वर्षाखालील वैयक्तिक गायन गटात प्रचेता सुपल हिने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक संपादन केले. विदिता गणेश, अमोल चव्हाण हे अनुक्रमे व्दितीय व तृतीय क्रमांकाचे तसेच मुक्ता पाटील ही उत्तेजनार्थ पारितोषिकाची मानकरी ठरली.
  • 15 वर्षावरील वैयक्तिक गायन गटात अश्विनी खानविलकर ही प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली तसेच जावेद अन्सारी, दिव्या अहिरे, यांनी अनुक्रमे व्दितीय व तृतीय क्रमांक आणि श्रध्दा काळे हिने उत्तेजनार्थ क्रमांक संपादन केला.
  • 15 वर्षाखालील समुह गायन गटात सुशिलादेवी देशमुख विद्यालय ऐरोली हे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. तसेच अंजुमन इस्लाम स्कुल तुर्भे आणि न्यू हॉरिझॉन हायस्कुल ऐरोली यांनी व्दितीय व तृतीय क्रमांक पटकाविला तसेच एस.एस.
  • 15 वर्षाखालील वैयक्तिक नृत्य गटात प्रतिक भेंग्रा याने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक संपादन केले. वेदांतीक भोसले व श्रुती गर्ग हे अनुक्रमे व्दितीय व तृतीय क्रमांकाचे तसेच तेजस पाटील हा उत्तेजनार्थ पारितोषिकाचा मानकरी ठरला.
  • 15 वर्षावरील वैयक्तिक नृत्य गटात विशाल नाईक हा प्रथम क्रमांकाची मानकरी ठरला तसेच सतिश चव्हाण व रोहीत पवार यांनी अनुक्रमे व्दितीय व तृतीय क्रमांक आणि सुश्मिता म्हात्रे हिने उत्तेजनार्थ क्रमांक संपादन केला.
  • 15 वर्षाखालील समुह नृत्य गटात रॉकींग रबाले हे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. तसेच एस.एस. हायस्कुल सिवूड आणि एन.डी.ए.ग्रुप तुर्भे यांनी व्दितीय व तृतीय क्रमांक पटकाविला तसेच फ्रेन्ड ग्रुप जुईनगर हे उत्तेजनार्थ पारितोषिकाचे मानकरी ठरले
  • 15 वर्षावरील समुह नृत्य गटात एच.ए.युनिटीज, सी.बी.डी. बेलापूर यांनी प्रथम क्रमांकाचे तसेच लक्ष डान्स ॲकॅडमी दिघा यांनी व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले.