प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी 31 जुलैची मुदत

मुंबई, 17 जुलै 2017/AV News Bureau:

खरीप हंगामात राज्यातील सर्व जिल्ह्यांत प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेत  सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2017 असल्याची माहिती कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली.

ठळक मुद्दे

  • योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या बँकेच्या शाखेत किंवा आपले सरकार सेवा केंद्र (डिजीटल सेवा केंद्र) येथे ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • योजनेतील सहभाग निश्चित करण्यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर बँकेत किंवा आपले सरकार सेवा केंद्रात नोंदणी करावी.
  • अंतिम मुदतीच्या दिनांकापूर्वी ज्या शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी होणार नाही त्यांना योजनेत सहभागी होता येणार नाही. मुदतीच्या शेवटच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेता त्यापूर्वीच शेतकऱ्यांनी नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा.

 

दरम्यान, शेतकऱ्यांनी तत्काळ आवश्यक त्या कागदपत्रांसह आपल्या जवळच्या बँक शाखेत किंवा आपले सरकार सेवा केंद्रात नोंदणी करावी. योजनेच्या नोंदणीसाठी आणि अधिक माहितीसाठी नजीकच्या विभागीय कृषी सह संचालक, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी देखील संपर्क साधता येईल, अशी माहिती फुंडकर यांनी दिली.