विशेष गाड्यांचे आरक्षण 16,18 फेब्रुवारीला

नवी मुंबई,13 फेब्रुवारी 2017 /AV News Bureau:

कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात येणाऱ्या गुडीपाडवा आणि उन्हाळी विशेष गाड्यांचे तिकिट आरक्षण 16 फेब्रुवारी आणि 18 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार आहे.

16 फेब्रुवारीपासून आरक्षण होणाऱ्या गाड्या

  • ट्रेन क्रमांक 02012 मडगाव – नागपुर सुपरफास्ट स्पेशल
  • ट्रेन क्रमांक 01430 मडगाव – मुंबई- पुणे स्पेशल
  • ट्रेन क्रमांक 01092 मडगाव- सीएसटी स्पेशल

18 फेब्रुवारीपासून आरक्षण होणाऱ्या उन्हाळी स्पेशल गाड्या

  • ट्रेन क्रमांक 01002 मडगाव- सावंतवाडी रोड स्पेशल
  • ट्रेन क्रमांक 01046 सावंतवाडी रोड –मुंबई सीएसटी स्पेशल
  • ट्रेन क्रमांक 02006 करमाळी- लोकमान्य टिळक टर्मिनस स्पेशल

कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेवून विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत.