भाजप, अमिरविरोधात गुन्हा दाखल करा

sachin sawant with saharia

काँग्रेसचे राज्य निवडणूक आयुक्तांना निवेदन

मुंबई,22 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:

आचारसंहितेच्या काळात पारदरर्शकता आणि परिवर्तन या मुद्द्यावर जाहिरात प्रसिद्ध केल्याप्रकरणी भाजप, मुंबई फर्स्ट या संस्थेबरोबरच जाहिरातीत झळकणाऱ्या अभिनेता अमिर खानविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करणारे निवेदन प्रदेश काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांना दिले आहे.

राज्यात होणा-या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या 48 तास आधी जाहिराती प्रसिद्द करण्यास राज्य निवडणूक आयोगाने बंदी घातली होती. तरीही मुंबई फर्ट संस्थेने भाजपने ज्या पारदर्शकता आणि परिवर्तन या मुद्द्यावर त्या मु्द्द्यावर मतदान करा अशा जाहिराती केल्या. अभिनेता आमिरखान याचे छायाचित्र या जाहिरातींमध्ये वापरले आहे. त्यामुळे आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

या तक्रारीत मुंबई फर्स्ट संस्थेने पारदर्शकता व परिवर्तन हे शब्द इतर अक्षरांपेक्षा मोठे छापले आहेत. राजकीय पक्षांना मनाई असल्यामुळे सदर संस्थेने भाजपला मदत करण्यासाठीच केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या संस्थेची वेबसाइट पाहिल्यास विश्वस्तांचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याशी जवळचे संबंध असल्याचे स्पष्ट दिसते.  त्याचा वापर करुन भाजपनेच सदर संस्थेला हाताशी धरून या जाहिराती प्रसिद्ध केल्या असा आरोप सावंत यांनी केला आहे.