उरण रेल्वेमार्गाच्या कामासाठी ट्रॅफिक ब्लॉक

  • 22 ते 25 डिसेंबर या काळात हार्बर मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

मुंबई, 21 डिसेंबर 2017/avirat vaatchal news :

बेलापूर-सीवूड्स-उरण रेल्वे मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेने कंबर कसली आहे. उरणच्या दिशेने जाणारा नवीन रेल्वे मार्ग सीवूड्स आणि बेलापूरदरम्यानच्या सध्याच्या रेल्वे मार्गाला जोडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या 22 डिसेंबर ते 25 डिसेंबर असा चार दिवसांचा टॅफिक ब्लॉक हार्बर मार्गावर जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे हार्बरमार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. uran railway line

बेलापूर-सीवूड्स-उरण रेल्वे मार्गाचे काम लवकर पूर्ण करण्याच्या दिशेने काम सुरु आहे. सध्याचा हार्बर मार्ग फेज 1 प्रकल्प फलाट क्रंमाक 4 ला जोडण्यात येणार आहे. या कामात सहा ठिकाणी रुळ तोडण्यात येणार आहे. तसेच पुन्हा जोडून त्यामध्ये नव्याने मार्ग तयार करण्यात येणार आहे. या कामासाठी ट्रॅफिक ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. uran railway line

22 व 23 डिसेंबर रोजीचा ट्रॅफिक ब्लॉक

  • शुक्रवारी पहाटे 2 वाजल्यापासून रविवारी पहाटे 2 वाजेपर्यंत 48 तासांचा बेलापूर येथील फलाट क्रमांक 2 वर
  • हार्बर मार्गावर एकूण गाड्या 604
  • ट्रॅफिक ब्लॉकच्या काळात 34 गाड्या रद्द
  • 34 विशेष गाड्या चालविणार (पनवेलहून 18, नेरुळहून 4, वाशीहून 1 आणि मानखूर्दहून 2 गाड्या )
  • बेलापूर येथून सुटणाऱ्या 8 गाड्यांपैकी सकाळच्या गर्दीच्यावेळी असणाऱ्या 7 गाड्या बेलापूर येथील फलाट क्रमांक 3 वरून सोडण्यात येतील. तर 1 गाडी वाशी येथून चालविण्यात येईल.
  • संध्याकाळी गर्दीच्यावेळी बेलापूरपर्यंत धावणाऱ्या 8 गाड्यांपैकी 5 गाड्या पनवेलपर्यंत चालविण्यात येणार आहेत. एक गाडी वाशीपर्यत चालविली जाईल तर 2 गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.
  • दिवसभरात बेलापूरहून सुटणाऱ्या आणि बेलापूरपर्यंत धावणाऱ्या 65 गाडयांपैकी 31 गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. तर 18 गाड्या बेलापूरऐवजी पनवेलपर्यंत चालविण्यात येणार आहेत. 4 गाड्या नेरुळपर्यंत चालविण्यात येतील तर 10 वाशी स्थानकापर्यंत आणि 2 मानखूर्द स्थानकापर्यंतच चालविण्यात येणार आहेत.
  • ट्रॅफिक ब्लॉकच्या काळात ट्रान्सहार्बर मार्गावरील गाड्या वेळापत्रकानुसार चालविण्यात येणार आहेत.

 

24 व 25 डिसेंबर रोजीचा ट्रॅफिक ब्लॉक

  • रविवारी पहाटे 2 ते सोमवारी पहाटे 2 असा 24 तासांचा ट्रॅफिक ब्लॉक बेलापूर येथील फलाट क्रमांक 2 वर असणार आहे.
  • हार्बर मार्गावरील एकूण गाड्या 482.
  • ट्रॅफिक ब्लॉकच्या काळात 12 गाड्या रद्द केल्या आहेत.
  • 24 विशेष गाड्या चालविणार (पनवेल येथून 10, नेरुळ येथून 4 आणि वाशी येथून 10 गाड्या)
  • सकाळी गर्दीच्या वेळी बेलापूर येथून 2 गाड्या फलाट क्रमांक 3 वरुन चालविण्यात येतील.
  • संध्याकाळी गर्दीच्यावेळी बेलापूरपर्यंत धावणाऱ्या 4 पैकी 3 गाड्या पनवेलपर्यंत चालविण्यात येतील तर 1 गाडी  वाशीपर्यंत चालविली जाईल.
  • दिवसभरात बेलापूरपर्यंतच्या 36 गाड्यांपैकी 12 गाड्या रद्द करण्यात येतील. 10 गाड्या पनवेलपर्यंत वाढविण्यात येतील. 4 गाड्या नेरुळ येथे थांबविण्यात येतील. त्याशिवाय 10 वाशी तर 2 मानखूर्द येथे थांबतील.
  • या काळात ट्रान्सहार्बरवरील गाड्या सुरळीत चालतील.

 

25 डिसेंबरचा ट्रॅफिक ब्लॉक

  • सोमवारी पहाटे 2 ते दुपारी 3 या काळात नेरुळ आण पनवेल दरम्यान अप आणि डाउन मार्गावर ट्रॅफिक ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.
  • हार्बर मार्गावरील एकूण गाड्या 482
  • रद्द केलेल्या गाड्या 164
  • ट्रान्सहार्बर मार्गावरील एकूण गाड्या 230.
  • रद्द केलेल्या गाड्या 40
  • नेरुळ आणि पनवेलदरम्यान 25 डिसेंबर रोजी पहाटे 2 ते दुपारी 3 या काळात ट्रान्सहार्बर मार्गावरील आणि हार्बर मार्गावरी गाड्या रद्द राहतील,असे मध्य रेल्वेने कळविले आहे.