नवी मुंबईत 315 धोकादायक इमारती

महापालिकेकडून यादी जाहीर

नवी मुंबई, 14 जून 2017/ AV News Breau:

पावसाळा सुरू होण्यापूर्वी नवी मुंबई महापालिकेने शहरातील 315 धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा 128 इमारतींचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. मागील वर्षी धोकदायक इमारतींचा आकडा 187 इतका होता.

या यादीनुसार बेलापूर येथीस पोलीस वसाहत, वाशी मधील बी टाईप, जेएन 1, जेएन 2, जेएन 3, डी टाईप मधील 1ते 4 इमारत क्रमांक, सी टाइप, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची इमारत, सेक्टर 17 मधील वाशी प्लाझा, सेक्टर 2 मधील मेघराज, मेघदूत टॉकीज, मॅफको मार्केट, कांदा- बटाटा मार्केट, तुर्भे येथील राम तनु माता बाल रूग्णालय यांचाही समावेश आहे.

या यादीत 2015-16, 2016-17आणि 2017-18 या वर्षांसाठीच्या धोकादायक इमारती, गृहनिर्णाण संस्था, व्यापारी आस्थापने, अशी  विभागणी करण्यात आली आहे.

बेलापूर विभागात 34, नेरूळ विभागात 30, वाशी विभागात 184, तुर्भे विभागात 16, कोपरखैरणे विभागात 16, घणसोली विभागात 10, ऐरोली विभागात 14, दिघा विभागात 3 धोकादायक इमारती घोषित करण्यात आल्या आहेत. यामध्ये घणसोली विभागात 2017-18 या कालावधीसाठी एकही इमारत धोकादायक म्हणून घोषित करण्यात आली नाही.