14 मार्चला कोकण विभागीय लोकशाही दिन

नवी मुंबई,1 मार्च 2017/AV News Bureau :

कोकण विभागीय स्तरावरील लोकशाही दिन/महिला लोकशाही दिन 14 मार्च रोजी सकाळी 10 वाजता  बेलापूर येथील कोकण भवन येथे आयोजित करण्यात आला आहे.  13 मार्च  रोजी  सार्वजनिक सुट्टी असल्याने लोकशाही दिन 14 मार्च रोजी घेण्यात येणार आहे.  या लोकशाही दिनी जनतेच्या तक्रारी, गाऱ्हाणी, अडचणींबाबत अर्ज / निवेदने स्विकारणार आहेत.

  • निवेदन स्विकारण्यासाठी निकष
  1. निवेदन स्विकारताना अर्जदाराची संबंधित तक्रार, जिल्हा स्तरावरील लोकशाही दिनात मांडण्यात आली होती व त्यावरील कार्यवाहीबाबत अर्जदार समाधानी नाहीत हे तपासून घेण्यात येणार आहे.
  2. अर्जदारास अर्जात कारणे नमूद करावी लागतील यासाठी जिल्हास्तरावरील निवेदनाची प्रत आणि लोकशाही दिनाच्या टोकनची व उत्तराची प्रत अर्जदारांना त्यांच्या अर्जासोबत जोडावी लागेल.
  3. अर्जाच्या तीन प्रती घेऊन अर्जदारांनी समक्ष येवून त्यांच्या तक्रारी, गाऱ्हाणे मांडावयाची आहेत.

वर नमूद केलेल्या पुर्ततेशिवाय लोकशाही दिनी अर्ज स्विकारला जाणार नाही,  याची कृपया नोंद घ्यावी असे विभागीय आयुक्तालयातर्फे कळविण्यात आले आहे.