कीर्तन हे प्रबोधनाचे उत्तम साधन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लातूर,25 मे 2017/AV News Bureau:

आपल्या देशात शेकडो वर्षापासून कीर्तनाची परंपरा सुरू आहे.  कीर्तनकार कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य वर्षानुवर्ष करत आहेत. असे हे कीर्तन समाज प्रबोधनाचे उत्तम साधन असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

औसा तालुक्यातील खरोसा येथील रेणुकादेवीचे दर्शन काल मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतले. त्यावेळी येथे सुरू असलेले कीर्तन ऐकल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी खरोसा येथील सरपंच व कीर्तनकार प्रशांत खानापुरकर  यांच्या  हस्ते मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.

हे सुरांचे कीर्तन असून या माध्यामातून समाज मनावर  चांगल्या विचारांची पेरणी होते. अशा विचारांतून जीवनही चांगले होत असते.

भारतात प्राचीन काळापासून कीर्तनाच्या माध्यामातून किर्तनकरांनी देश, संस्कृती व समाजाची फार मोठी सेवा केलेली आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

आजच्या काळात ही कीर्तनकार समाजाचे प्रबोधन करून समाजात स्फुल्लींग निर्माण करण्याचे कार्य करतात. समाजातील अनिष्ठ रुढी परंपरावर प्रहार करून समाजाला योग्य दिशा देण्याचे काम करत आहेत,असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.