14 मार्चला कोकण विभागीय पेन्शन अदालत

नवी मुंबई, 6 मार्च 2017/AV News Bureau:

कोकण विभागीय पेन्शन अदालत 14 मार्च रोजी दुपारी 4 वाजता सीबीडी बेलापूर येथील कोकण भवनमध्ये आयोजित करण्यात आली आहे.

कोकण विभागाअंतर्गत पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्हे येतात. सदर पेन्शन अदालतीमध्ये सेवानिवृत्त शासकीय अधिकारी व कर्मचा-यांच्या प्रलंबित प्रकरणाच्या अडचणीचे निवारण करण्यात येणार आहे. सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या पेन्‍शन प्रकरणांबाबतच्या तक्रारींचे अर्ज या पेन्शन अदालतीमध्ये स्वीकारले जातील.

सेवानिवृत्त शासकीय अधिकारी, कर्मचा-यांची पेन्शनसबंधीची प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी विभागीय स्तरावर पेन्शन अदालत आयोजित केली जाते. तरी सेवानिवृत्त कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची पेन्शनसंबंधी तक्रारी असल्यास त्यांनी सादर कराव्यात, असे आवाहन कोकण विभागीय आयुक्तांनी केले आहे.