होळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर आणखी 9 गाड्या

नवी मुंबई, 8 मार्च 2017/AV News Bureau:

होळीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी लक्षात घेवून मध्य रेल्वेने कोकण रेल्वेच्या सहकार्याने सीएसटी आणि करमाळी/सावंतवाडी रोड/ यशवंतपुर दरम्यान 9 विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. 11 ते 13 मार्च दरम्यान या विशेष गाड्या चालविण्यात येणार आहे. या गाड्यांचे तिकिट बूकींग उद्या 9 मार्चपासून सुरू होणार आहे.

 1)सीएसटी-करमाळी विशेष (2)

  1. गाडी क्रमांक 02003 ही 12 मार्च रोजी पहाटे 1.10 ला सीएसटी स्थानकातून सुटेल आणि त्याच दिवशी दापीर 12.20 ला करमाळी रेल्वे स्थानकात पोहोचेल.
  2. गाडी क्रमांक 02004 ही 12 मार्चला दुपारी 1.35 ला करमाळी स्थानकातून सुटेल त्याच दिवशी रात्री 11.20 ला सीएसटी स्थानकात पोहोचेल.
  • थांबे

 या गाड्या  दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळुण, रत्नागिरी, राजापुर रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम रेल्वे स्थानकात थांबणार आहेत.

  • डब्यांची रचना

या गाड्यांना 1 टु टायर एसी, 2 थ्री टायर एसी, 4 स्लीपर क्लास , 9 सेकंड क्लास डबे जोडण्यात येणार आहेत.

2)मुंबई सीएसटी- सावंतवाडी रोड विशेष (2)

  1. गाडी क्रमांक 01103 ही 11 मार्चला पहाटे 1.10 ला सीएसटीहून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 12.20 ला सावंतवाडी रोड स्थानकात पोहोचेल .
  2. गाडी क्रमांक 01104 ही 11 मार्चला दुपारी 2.15 ला सावंतवाडी रोडहून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 11.55 ला मुंबई सीएसटीला पोहोचेल.
  • थांबे

गाडीला दादर, ठाणे, पनवेल,रोहा,माणगाव, खेड, चिपळुण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापुर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

  • डब्यांची रचना

या गाडीला 1 एसी चेअर कार, 10 सेकंड क्लास चेअर कार, 2 सेकंड क्लास डबे जोडण्यात येणार आहेत.

3) मुंबई सीएसटी- सावंतवाडी रोड (2) 

  1. गाडी क्रमांक 01105 ही 12 मार्चला पहाटे 1.30 ला सीएसटीहून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 12.20 ला सावंतवाडी रेल्वे स्थानकात पोहोचेल.
  2. गाडी क्रमांक 01106 ही 12 मार्चला दुपारी 3 वाजता सावंतवाडी रोडहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 12.40 ला मुंबई सीएसटीला पोहोचेल.
  • थांबे

या गाडीला दादार, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड,चिपळुण, संगमेश्वर रोड,रत्नागिरी, राजापुर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

  • डब्यांची रचना

या गाड्यांना 1 एसी चेअर कार, 10 सेकंड क्लास चेअर कार, 2 सेकंड क्लास डबे जोडण्यात येतील.

4)  मुंबई सीएसटी- सावंतवाडी रोड विशेष (2)

  1. गाडी क्रमांक 01095 ही 13 मार्चला पहाटे 1.10 ला मुंबई सीएसटीहून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 12.20 ला सावंतवाडी रोडला पोहोचेल.
  2. गाडी क्रमांक 01096 ही 13 मार्चला दुपारी 3 वाजता सावंतवाडी रोडहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 12.40 ला मुंबई सीएसटी स्थानकात पोहोचेल.
  • थांबे

या गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणसाव, खेड, चिपळुण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापुर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

  • डब्यांची रचना

या गाड्यांना 1 एसी चेअर कार, 10 सेकंड क्लास चेअर कार, 2 सेकंड क्लास डबे जोडण्यात येणार आहेत.

5) मुंबई सीएसटी- यशवंतपुर विशेष (1)

  1. गाडी क्रमांक 01185 हा 13 मार्चला सायंकाळी 5.15 ला सीएसटीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री 8 वाजता यशवंतपुरला पोहोचेल.
  • गाड्यांना थांबे

या गाड्यांना लोणावळा, पुणे, मिरज, बेळगावी, लोंडा, धारवाड, हुबळी,दावनगिरी, बिरुर जंक्शन या स्थानकांवर थांबा देण्यात येईल.

  • डब्यांची रचना

या गाडीला 1 टु टायर एसी, 4 थ्री टायर एसी, 6 स्लीपर क्लास आणि 2 सेकंड क्लास डबे जोडण्यात येणार आहेत.

  • तिकिट बूकींग

होळीनिमित्त सोडलेल्या 02003,01103,01105,01095 आणि 01185 या विशेष गाड्यांचे आरक्षण 9 मार्चपासून सुरू होणार आहे.