दारू तस्करी रोखण्यासाठी ‘ट्रॅक अॅण्ड ट्रेस’

 

मुंबई, 8 मार्च 2017/AV News Bureau:

राज्यात देशी-विदेशी मद्य आणि मद्यार्काच्या अवैध तस्करीला आळा बसावा मद्याची चोरटी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा शोध घेण्यासाठी जीपीएस ट्रॅक अण्ड ट्रेस प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखऱ बावनकुळे यांनी विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली आहे.

अवैध मद्य, मद्य आणि मद्यार्काची अवैध विक्रीचा परिणाम राज्याच्या महसूलावर होतो. त्यामुळे उत्पादन शुल्कापासून मिळणाऱ्या महसूलाची गळती थांबवून महसूल वाढविण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ट्रॅक अण्ड ट्रेस प्रणाली विकसित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 21 जानेवारी 2017 अन्वये तज्ज्ञ समिती निर्माण करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून हे काम करण्यात येत असल्याचे उत्तर बावनकुळे यांनी दिले आहे.अॅड. अनिल परब यांनी याबाबतचा तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता.