महिलांसाठी ‘बी बोल्ड फॉर चेंज’ कॅम्पेन

महिलांना स्वसंरक्षण आणि आपत्ती व्यवस्थापनांसदर्भात प्रशिक्षण

नवी मुंबई, 8 मार्च 2017/AV News Bureau:

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त वाशी येथील फोर्टीस नेटवर्क हॉस्पिटलमधील हिरानंदानी हॉस्पिटलने ‘बी बोल्ड फॉर चेंज’ या उपक्रमाची घोषणा केली. महिनाभर चालणार्‍या या उपक्रमातून  महिलांना आपत्तींचा सामना करण्याकरिता प्रशिक्षण दिले जाणार आहे.  यासाठी नवी मुंबईमधील १५० हून अधिक गृहनिर्माण संस्थांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.

या उपक्रमाचे उद्घाटन वाशी येथील हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये करण्यात आले. यावेळी नवी मुंबई गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक माया मोरे, वाशी दहशतवाद विरोधी कक्ष व सागरी सुरक्षा प्रमुख व उप पोलिस निरीक्षक ज्योती सुर्यवंशी, नवी मुंबईचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रभाकर गाडे, लायन क्लब्स गव्हर्नरच्या पत्नी श्रीमती उपेन्द्र भलवाल यांच्यासोबत डॉ. वंदना गावडी, डॉ. मनिषा बोबाडे आदि उपस्थित होते.

या प्रशिक्षण शिबिरांदरम्यान हिरानंदानी हॉस्पिटलचे वैद्यकीय कर्मचारी बेसिक लाईफ सपोर्ट प्रशिक्षण, प्रथमोपचार सहाय्यता व मुलांचे संगोपन कार्यशाळांच्या माध्यमातून महिलांना त्यांच्या घरांमध्ये व सार्वजनिक ठिकाणी निर्माण होणार्‍या आपत्तीजनक परिस्थितींवर मात करण्याकरिता प्रशिक्षण देणार आहेत.