25 टक्के आरक्षित प्रवेशाची मुदत 18 मार्च पर्यंत

नवी मुंबई, 14 मार्च 2017/AV News Bureau:

आर्थिक दुर्बल घटकातील बालकांसाठी 25 टक्के आरक्षित प्रवेश प्रक्रियेची मुदत 15 ऐवजी 18 मार्च करण्यात आली आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत दुर्बल व वंचित घटकातील बालकांसाठी 25 टक्के आरक्षित प्रवेश प्रक्रिया सन 2017-18 या शैक्षणिक वर्षामधील प्रथम फेरीतील प्रवेश जाहिर झाले असून प्रवेश घेण्याची मुदत दिनांक 15 मार्च 2017 अशी होती.मात्र त्यामध्ये आता बदल करून ही मुदत 18 मार्च पर्यंत वाढविण्यात आली आहे. या बदलाची नोंद घेवून पालकांनी प्रवेशाबाबत कार्यवाही करावी,असे आवाहन पालिकेच्या शिक्षण विभागाने केले आहे.