नगर बनावट दारु प्रकरणी सीआयडी चौकशी

उत्पादन शुल्क मंत्री बावनकुळे

मुंबई ,22 मार्च 2017 /AV News Bureau:

अहमदनगर मधील बनावट दारु प्रकरणी सीआयडी मार्फत चौकशी करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल, असे उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत सांगितले.

अहमदनगरमधील बनावट दारुमुळे 9 जणांना प्राण गमवावे लागले या विषयावर लक्षवेधी उपस्थित करण्यात आली होती. विजय वडेट्टीवार, देवयानी फरांदे, शिवाजी कर्डिले, हरीष पिंपळे आदी आमदारांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमांतून विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात बावनकुळे यांनी वरील माहिती विधानसभेत दिली.

बनावट दारुप्रकरणी मुख्य आरोपी दादा वाणी याला अटक करण्यात आली. एकूण 18 आरोपींपैकी 16 आरोपींना अटक करण्यात आली आहे. दोन आरोपी फरार आहेत. मुख्य आरोपी दादा वाणी याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आहे. तर उत्पादन शुल्क विभागातील सहा अधिकाऱ्यांना निलंबीत करण्यात आले. यात एक उपअधिक्षक, दोन दुय्यम निरीक्षक आणि तीन जवानांचा समावेश असल्याचे उत्पादन शुल्क मंत्री म्हणाले.