कोकण रेल्वे मार्गावर सहा विशेष उन्हाळी गाड्या

अविरत वाटचाल न्यूज

नवी मुंबई, 5 मे 2018

उन्हाळी सुट्टीनिमित्त कोकणात तसेच गोव्याला जाणाऱ्या आणि मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेच्या सहकार्याने कोकण रेल्वेमार्गावर मुंबई सीएसएमटी ते करमाळीदरम्यान आणखी सहा विशेष उन्हाळी गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 9 ते 11 मे दरम्यान या विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.

सीएसएमटी-करमाळी विशेष (2 फेऱ्या)

  1. गाडी क्रमांक 01127 ही विशेष गाडी 9 मे रोजी मध्यरात्री 12.20 ला सीएसएमटीहून सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी 11.30 ला करमाळी स्थानकात पोहोचेल.
  2. गाडी क्रमांक 01128 ही विशेष गाडी 11 मे रोजी सकाळी 10.20 वाजता करमाळी स्थानकातून सुटेल आणि त्याचदिवशी रात्री 11.15 ला सीएसएमटी स्थानकात पोहोचेल.
  • गाडीचे थांबे

या विशेष गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळुण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि थिविम या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.

  • डब्यांची रचना

या विशेष गाड्यांना 15 स्लीपर आणि 2 जनरल डबे जोडण्यात येणार आहेत.

पनवेल-करमाळी (2 फेऱ्या)

  1. गाडी क्रमांक 01129 ही विशेष गाडी 9 मे रोजी रात्री 11.40 ला पनवेल स्थानकातून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता करमाळी स्थानकात पोहोचेल.
  2. गाडी क्रमांक 01130 ही विशेष गाडी 9 मे रोजी दुपारी 2 वाजता करमाळी स्थानकातून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 10.40 ला पनवेल स्थानकात पोहोचेल.
  • गाडीचे थांबे

या विशेष गाडीला रोहा, खेड, चिपळुण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि थिविम स्थानकात थांबा देण्यात येणार आहे.

  • डब्यांची रचना

या विशेष गाड्यांना 15 स्लीपर डबे आणि 2 सेकंडक्लासचे डबे जोडण्यात येणार आहेत.

पनवेल-करमाळी विशेष गाड्या (2 फेऱ्या)

  1. गाडी क्रमांक 01129 ही विशेष गाडी 10 मे रोजी रात्री 11.40 ला पनवेल स्थानकातून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता करमाळी स्थानकात पोहोचेल.
  2. गाडी क्रमांक 01130 ही विशेष गाडी 9 मे रोजी दुपारी 1.40 वाजता करमाळी स्थानकातून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 10.15 ला पनवेल स्थानकात पोहोचेल.
  • गाडीचे थांबे

या विशेष गाडीला रोहा, खेड, चिपळुण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि थिविम स्थानकात थांबा देण्यात येणार आहे.

  • डब्यांची रचना

या विशेष गाड्यांना 15 स्लीपर डबे आणि 2 सेकंडक्लासचे डबे जोडण्यात येणार आहेत.