2019 पर्यंत सर्वांना 24 तास वीज पुरवणार   

केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांची माहिती

नवी दिल्ली, 24 मार्च 2017:

देशात सर्वांना सप्ताहभर अगदी चोवीस तास परवडणारी आणि पर्यावरण स्नेही ऊर्जा पुरवण्याच्या उद्देशाने सरकारने अनेक उपाय योजना केल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांनी लोकसभेत दिली.

आखलेल्या योजना

  • 1 एप्रिल 2015च्या आकडेवारीनुसार वीज नसणाऱ्या 18,452 गावांचे विद्युतीकरण करणे. तर 20 मार्च 2017 पर्यंत 12,661 गावांचे विद्युतीकरण पूर्ण झाले.
  • सर्व दिवस चोवीस तास वीज पुरवण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार करणे. त्याप्रमाणे वीज निर्मिती, वितरण प्रणाली तयार करणे.

 राबविलेल्या योजना

  • ग्रामीण भागांसाठी दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना लागू करण्यात आली. कृषी आणि अ-कृषी अशा दोन स्वतंत्र जोडण्या करुन वीज पुरवठ्यासाठी पायाभूत सुविधा तयार करण्यात आल्या.
  • शहरी विभागासाठी एकीकृत ऊर्जा विकास योजना सुरु करण्यात आली.
  • विद्युत वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरु केला.
  • ‘उदय’ योजना लागू करण्यात आली.
  • कोळशावर आधारीत ऊर्जा प्रकल्पांचा खर्च अशा पद्धतीने कमी होऊ शकतो, याचा विचार प्राधान्याने करण्यात आला. यामध्ये देशातला कोळसा वापरण्यावर भर देण्यात आला.
  • 2014-17 (28.2.2017 पर्यंत) या काळात ऊर्जा निर्मितीमध्ये 56,232.6 मेगावॅटची वाढ नोंदवली गेली.
  • सन 2013-14 मध्ये वीजनिर्मितीमध्ये 967 अब्ज युनिटवरुन 1048 अब्ज युनिटपर्यंत वृद्धी झाली. चालू वर्षात 2016-17 मध्ये फेब्रुवारी 2017 पर्यंत 746 अब्ज युनिट वीजनिर्मिती करण्यात आली आहे.
  • विद्युत उपकेंद्राच्या क्षमतेमध्ये वाढ नोंदवण्यात आली.
  • नवीनीकरण ऊर्जेसाठी हरित ऊर्जा पट्टा तयार करण्यात आला.
  • एलईडी बल्ब व ऊर्जा बचत करणारे पंखे,ट्युब

‘उन्नत ज्योती’ अंतर्गत सर्वांना वीज देण्यासाठी अतिशय परवडणाऱ्या किंमतीत ‘एलईडी’ बल्बचा पुरवठा करण्यात आला. या योजनेतून 77 कोटी बल्ब बदलण्यात आले. आतापर्यंत देशभरात 21.8 कोटी एलईडी बल्ब वितरीत करण्यात आले. त्या व्यतिरिक्त 5.36 लाखांपेक्षा जास्त ऊर्जा बचत करणारे पंखे आणि 13.37 लाख एलईडी ट्यूब वाटण्यात आले.

  • एलईडी पथदिवे

राष्ट्रीय पथदिवे कार्यक्रमांतर्गत 1.4 कोटी एलईडी पथदिवे बसवण्यात आले आहेत. यामुळे 9 अब्ज केडब्ल्यूएच वीजेची मार्च 19 पर्यंत बचत होणार आहे. आत्तापर्यंत देशभरातल्या रस्त्यांवरचे 18.3 लाख दिवे बदलून त्या जागी एलईडी दिवे बसवण्यात आले आहेत,अशी माहिती ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांनी  सभागृहात लेखी उत्तरात दिली.