ठाण्यात लवकरच अत्‍याधुनिक जिम्नॅ​स्टिक सेंटर

ठाणे, 4 एप्रिल 2017/AV News Bureau:

ठाणे शहरात उभारण्‍यात येणा-या अत्‍याधुनिक जिम्नॅस्टिक सेंटरच्‍या आराखडयास महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मान्यता दिली आहे.

ठाणे शहरामधील पोखरण रोड नं. 2 येथे टाटा गृह निर्माण प्रकल्‍पात हे अत्‍याधुनिक जिम्नॅस्टिक सेंटर उभे राहणार आहे. यामध्‍ये खेळाडू व संघासाठी सराव कक्ष, फिजिओेथेरपि रुम, म्युझिक रुम, व्‍ही.आय.पी.रुम, ज्‍युरी रुम, प्रशासकीय रुम, योगा रुम, 300 व्‍यक्‍ती क्षमता असलेली प्रेक्षक गॅलरी, पार्कींग अशा विविध सुविधा या अत्‍याधुनिक जिम्नॅस्टिक सेंटरमध्‍ये असणार आहेत.

या जिम्नॅस्टिक सेंटरचे आराखडे सुप्रसिध्द वास्‍तुविशारद शशी प्रभू अ‍ॅन्ड असोसिएटस् यांनी तयार केले आहेत.  सदर अत्‍याधुनिक जिम्नॅस्टिक सेंटरचे संपूर्ण बांधकाम टाटा हाऊसिंग डेव्हलपमेंट कंपनी लि. हे करणार असून येत्‍या 10 दिवसात या कामाला सुरुवात होणार आहे. हे  काम डिसेंबर 2017 अखेर पूर्ण करण्‍यात येणार आहे.