दिल्ली महापालिका निवडणुकीत रिपाइं 40 जागा लढविणार 

रिपाइंचे अध्यक्ष आणि  केंद्री राज्यमंत्री रामदास आठवले यांची माहिती

नवी दिल्ली, 5 एप्रिल 2017/AV News Bureau:

दिल्ली महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) 40 जागा लढविणार आहेत. त्यापैकी 34 उमेदवारांची यादी  जाहीर करण्यात आली असल्याची माहिती रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री   रामदास आठवले यांनी दिली .

यावेळी आठवले  यांच्या समवेत रिपाइंचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष  मिरझा बेग, उत्तर भारत अध्यक्षा मंजू छिबेर,  ललित गुलिया,  तेजपाल सिंह, बिशन स्वरूप आदी मान्यवर उपस्थित होते .

दिल्ली विधान सभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने  दिलेली  कोणतीही आश्वासने पूर्ण केलेली नाहीत, असा आरोपही आठवले यांनी यावेळी केला .

दिल्लीवासीयांचा विश्वासघात केजरीवाल सरकार ने केला असल्याने आम आदमी पक्षाला रोखण्यासाठी आणि दिल्लीतून मायावतींच्या बसपाचा  सफाया करण्यासाठी रिपब्लिकन पक्ष दिल्ली महापालिका निवडणूक ताकदीने लढविणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.