मध्य रेल्वेचा ठाणे ते पनवेल-वाशी मार्गावर ब्लॉक

नवी मुंबई, 7 एप्रिल 2017/AV News Bureau:

रेल्वे मार्गावरील तांत्रिक कामांमुळे येत्या रविवारी मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावरील गाड्या बंद ठेवण्यात येणार आहेत. या दिवशी हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नसल्याचेही मध्य रेल्वेने जाहीर केले आहे.

रविवारी सकाळी 10.53  ते दुपारी 2.38 या काळात ठाणे ते पनवेल, वाशी, नेरुळ आणि सकाळी 10.47 ते दुपारी 2.30 या काळात पनवेल, वाशी, नेरूळ ते ठाणे दरम्यानची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.  या ब्लॉकच्या काळात प्रवाशांना मेन लाइन आणि हार्बर मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.