नेरुळ येथे गरजूंना मोफत अन्नवाटप

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, ४ एप्रिल २०२०

 

  • नोंदणीकृत रूग्णालये, वैद्यकीय व्यावसायिक, औषध दुकाने बंद राहिल्यास कारवाई
    https://bit.ly/39irGYI

नेरूळ येथे रस्त्यावर रहाणारे गोरगरिब कुटुंबातील लोकांना आणि  आपल्या नेरूळ पोलीस बांधवांसाठी मोफत जेवण आणि अन्न वाटप करण्यात आले.

याप्रसंगी माजी सिडको संचालक व नगरसेवक नामदेव भगत व नेरूळगांवातील समाजसेवक संजय म. ठाकूर , किशोर पाटिल, दिलीप घरत, संतोष गर्जे, सागर ठाकूर, रामचंद्र म्हात्रे, धनवंत ठाकूर, प्रथमेश ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.

  • नवी मुंबईत नागरिकांना घराजवळच भाजीपाला उपलब्ध करून देणार
    https://bit.ly/33PsyCJ

या मोफत अन्नदानाचा नेरुळ रेल्वे स्थानक आणि आजुबाजूच्या परिसरातील असंख्य गरजूंनी लाभ घेतला.

कोरोनाच्या आक्रमणामुळे असंख्य गरीबांचे अन्नपाण्यावाचून अतोनात हाल  झाले आहेत. त्यामुळे माणुसकीच्या नात्याने आपल्या या बंधू भगिनींना शक्य तितके अन्न पुरविण्याचा आपला प्रयत्न असल्याचे सामाजिक कार्यकर्ते किशोर पाटील, संतोष गर्जे आदींनी सांगितले.

 

======================================================

  • इतर बातम्यांचाही मागोवा