कोकण रेल्वे मार्गावर सौंदळ नवे स्थानक सुरू, पॅसेंजर गाड्या थांबणार

नवी मुंबई,8 एप्रिल 2017/AV News Bureau:

विलवडे आणि राजापूर रेल्वे स्थानकांदरम्यानच्या गावांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. कोकण रेल्वे मार्गावर सौंदळ हे नवीन रेल्वे स्थानक 9 एप्रिलपासून सुरू होणार आहे. या रेल्वे स्थानकावर रत्नागिरी-मडगाव-रत्नागिरी आणि सावंतवाडी रोड-दिवा-सावंतवाडी रोड या पॅसेंजर थांबविण्यात येणार आहे.

  • गाडी क्रमांक 50105 दिवा- सावंतवाडी आणि गाडी क्रमांक 50102 मडगाव-रत्नागिरी पॅसेंजर 9 एप्रिलपासून सौंदळ रेल्वे स्थानकावर थांबविण्यात येणार आहे.

time table 1

  • गाडी क्रमांक 50101रत्नागिरी-मडगाव आणि गाडी क्रमांक 50106 सावंतवाडी-दिवा पॅसेंजर 10 एप्रिलपासून सौंदळ रेल्वे स्थानकावर थांबविण्यात येणार आहे.
  • time table 2