बाहुबली 2: द कनक्लुजन चे नवे पोस्टर

मुंबई,12 एप्रिल 2017/AV News Bureau:

सगळ्यांचे लक्ष लागलेला बाहुबली 2: द कनक्लुजन हा बिगबजेट चित्रपट या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र त्याआधीच प्रेक्षकांची उत्कंठा वाढविणारे या चित्रपटाच्या नव्या पोस्टरचे आज अनावरण करण्यात आले. घाटकोपर येथील आर मॉलमध्ये चित्रपटाचे डायरेक्टर एस. राजामौली यांच्या उपस्थितीत बाहुबली 2: द कनक्लुजनचे नवे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले.

बाहुबली-१ ला प्रेक्षकांचा विक्रमी पाठिंबा मिळाला. कटप्पाने बाहुबलीला का मारले ? याचे उत्तर अद्याप प्रेक्षकांना कळलेले नाही. आता याचे उत्तर बाहुबली 2: द कनक्लुजनमध्ये मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकही आतुरतेने या चित्रपटाची वाट पहात आहेत. येत्या २८ एप्रिल रोजी हा चित्रपट सर्वत्र झळकणार आहे. प्रभास , राणा डग्गुबती, तम्मना, अनुष्का शेट्टी आणि सत्याराज आदींच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट तेलगु, तमिळ आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे.