रविवारी मेन आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई, 15 एप्रिल 2017/AV News Bureau:

रेल्वे मार्गावरील तांत्रिक कामे करण्यासाठी मध्य रेल्वेतर्फे येत्या रविवारी (16 एप्रिल रोजी) मेन लाइन आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. या मेगाब्लॉकमुळे हार्बरमार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे तर मेन लाइनवरील गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. मेगाब्लॉकदरम्यान हार्बरमार्गावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वरून पनवेल-कुर्ला विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.

मेन लाइन

  • ठाणे-कल्याण डाउन स्लो मार्गावर सकाळी 11.20 ते दुपारी 4.20  या काळात सकाळी 10.48 ते दुपारी 4.23 दरम्यान मुलुंड स्थानकातून सुटणाऱ्या स्लो मार्गावरील गाड्या मुलुंड आणि कल्याण दरम्यान जलद मार्गावर चालविण्यात येणार आहेत. या गाड्या ठाणे, दिवा आणि डोंबिवली स्थानकात थांबविण्यात येणार आहेत.  गाड्या 10 मिनिटे उशिरा धावणार आहेत.
  • डाउन स्लो मार्गावरील गाड्या कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली या स्थानकांवर थांबणार नाहीत. या रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांना अप दिशेने दिवा, डोंबिवली, कल्याण मार्गे पुढील प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
  • सकाळी 10.20 ते दपारी 2.42 या काळात सीएसटीहून सुटणार्या डाउन फास्ट गाड्या आपल्या नियमित थांब्याव्यतिरिक्त घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकांवर थांबणार आहेत. या गाड्या 10 मिनिटे उशिरा धावणार आहेत.
  • सकाळी 11 ते दुपारी 3.8 या काळात कल्याणहून सुटणाऱ्या अप फास्ट गाड्या आपल्या नियमित थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला या स्थानकावर थांबणार आहेत. या गाड्या 15 मिनिटे उशिरा धावणार आहेत.
  • सकाळी 11 ते सायंकाळी 5 या काळात सीएसटीहून सुटणाऱ्या आणि सीएसटीला जाणाऱ्या स्लो मार्गावरील सर्व गाड्या 10 मिनिटे उशिरा धावणार आहेत.

हार्बर मार्ग

  • सकाळी 11.21 ते दुपारी 4.39 या काळात सीएसटीहून वाशी, बेलापूर, पनवेलकडे जाणाऱ्या तसेच सकाळी 10.38 ते दुपारी 4.43 या काळात सीएसटीहून वांद्रे, अंधेरीला जाणाऱ्या गाड्या बंद ठेवण्यात येणार आहेत.
  • सकाळी 9.52 ते दुपारी 3.26 या काळी पनवेल, बेलापूर, वाशी येथून सीएसटीला जाणाऱ्या आणि सकाळी 10.44 ते दुपारी 4.13 ला वांद्रे, अंधेरीहून सीएसटीला जाणाऱ्या हार्बरमार्गावरील गाड्या बंद ठेवण्यात येणार आहेत.
  • मेगाब्लॉकदरम्यान हार्बरमार्गावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वरून पनवेल-कुर्ला विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.
  • मेगाब्लॉकदरम्यान हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते दुपारी 4 या काळात पश्चिम रेल्वे तसेच मेन लाइनवरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आल्याचे मध्य रेल्वेने कळविले आहे.