पारंपरिक रस्ते बंद झाल्याने वाशीचे ग्रामस्थ आक्रमक

  • सार्वजनिक बांधकाम विभाग, वाशी पोलिसांना निवेदन
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई, २ डिसेंबर २०१९

सायन पनवेल महामार्गाच्या रुंदीकरण कामामुळे गावाचे पारंपारिक रस्ते बंद झाले आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे गावाचा सर्व्हिस रस्ता व वाशी सेक्टर-४,५,६,७,८,९ कड़े जाण्यासाठी बंद असलेल्या रस्ता खुला करुन देण्यात यावा यासाठी माजी विरोधी पक्ष नेते दशरथ भगत, युवा नेते निशांत भगत , नगरसेविका फशीबाई भगत आणि स्थानिक नागरिकांच्या वतीने २ डिसेंबर रोजी वाशीचे सहाय्यक पोलीस आयुक्त गोवेकर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख तसेच सार्वजनिक बांधकाम विभागच्या अधिकारी श्रीमती देसाई यांना निवेदन देण्यात आले.

२० मे रोजी वाशी गाव आणि वाशी शहरातील नागरिकांनी सायन – पनवेल महामार्ग लगत सर्व्हिस रस्त्याकरिता जन आंदोलन केले होते. पारंपरिक रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD ) आणि नवी मुंबई महानगरपालिकेने बंद केल्याने मच्छीमार बांधव, शाळकरी मूले व पालक, मंदिरा मध्ये ये – जा करणारे ग्रामस्थ यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे वाशी गावातील ग्रामस्थानी एकत्र येवुन सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD ) यांचा सायन – पनवेल महामार्गा चालू असलेल्या रस्त्याचे काम बंद पाडले.

=======================================================

वाशी रेल्वे स्थानकाच्या पूर्वेस तिकीट खिडकीसाठी आंदोलन 

========================================================

सदर सायन  – पनवेल महामार्ग लगत सर्व्हिस रस्त्या संदर्भात पुढील दिशा ठरवण्यासाठी व जन आंदोलन उभारण्यासाठी ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ५. ३०  वाजता प्रेमनाथ पाटील चौक वाशी गाव येथे ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती निशांत भगत यांनी दिली.

======================================================

मागील इतर बातम्यांचाही मागोवा

  • सर्व्हिस रोडसाठी २० मे रोजी वाशी ग्रामस्थांनी केले होते आंदोलन