ट्रान्सहार्बरवर 3 दिवस ट्रॅफिक ब्लॉक

मुंबई, 18 एप्रिल 2017/AV News Bureau :

रेल्वे मार्गाच्या दुरूस्ती आणि देखभालीचे काम करण्यासाठी मध्य रेल्वेने ठाणे ते वाशी, नेरूळ, पनवेल दरम्यानच्या मार्गावर 20, 22 आणि 23 एप्रिल रोजी ट्रॅफिक ब्लॉक जाहीर केला आहे. दुपारी 12.35 ते दुपारी 2.5 या काळात हे ट्रॅफिक ब्लॉक करण्यात येणार आहे. यामुळे या मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक बदलणार आहे.

  • डाऊन ट्रान्सहार्बरवर पुढील 20,22 आणि 23 एप्रिल रोजी रद्द होणाऱ्या गाड्या
  1. वाशीहून ठाण्याला जाणारी दुपारी 12.12 ची गाडी, 12.40 ची गाडी, 1.1 ची गाडी,1.25 ची गाडी आणि 1,57 ची गाडी
  2. नेरूळहून ठाण्याला जाणारी दुपारी 12.20 ची गाडी, 1.10 ची गाडी आणि 1.37 ची गाडी
  3. पनवेलहून ठाण्याला जाणारी दुपारी 12.52 ची गाडी, 1.18 ची गाडी आणि दुपारी 2.5 ची गाडी
  • अप ट्रान्सहार्बरवर पुढील 20,22 आणि 23 एप्रिल रोजी रद्द होणाऱ्या गाड्या
  1. ठाण्याहून वाशीला जाणारी दुपारी 12.21 ची गाडी, 12.49 ची गाडी, 1.18 ची गाडी, 1.40 ची गाडी, 2.2 ची गाडी
  2. ठाण्याहून नेरूळला जाणारी दुपारी 12.10 ची गाडी, 12.31 ची गाडी, 1.00 ची गाडी, 1.50 ची गाडी
  3. ठाण्याहून पनवेलला जाणारी दुपारी 12.18 ची गाडी, 1. 4 ची गाडी

दरम्यान, ट्रॅफिक ब्लॉकच्या काळात या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हार्बर आणि मेन लाइनवरून प्रवासाची मुभा देण्यात आल्याचे मध्य रेल्वेने कळविले आहे.