दंत महाविद्यालयांच्या प्रवेश क्षमतेत वाढ

 मुंबई, 8 मे 2017/AV News Bureau:

अहमदनगर येथील कै.यशवंतराव चव्हाण मेमोरियल अँड रुरल डेव्हलपमेंट फॉउंडेशन पदव्युत्तर दंत महाविद्यालय व रुग्णालय येथील पेरिओडेन्टॉलॉजी या विषयाच्या दंत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थी प्रवेश क्षमतेत 3 वरुन 6 इतकी वाढ करण्यात आली आहे.

संगमनेर तालुक्यातील घुलेवाढी (अमृतनगर) येथील एसएनबीटी सेवाभावी संस्थेच्या एसएमबीटी दंत महाविद्यालय व रुग्णालय, पदव्युत्तर संशोधन सेंटर येथील सन 2017-18 या शैक्षणिक वर्षापासून कन्झरव्हेटीव डेन्टीस्ट्री अँड एंडोडोन्टीक्स, पेरिओडेन्टॉलॉजी या दोन विषयातील अभ्यासक्रमाच्या प्रवेश क्षमतेत प्रत्येक विषयात 3 वरुन 5 इतकी वाढ करण्यात आली आहे.