१३ जूनला कोकण विभागीय पेन्शन अदालत

नवी मुंबई जून २०१७/AV News Bureau:

कोकण विभागाअंतर्गत येणाऱ्या शासकीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनविषयक प्रलंबित प्रकरणे सोडविण्यासाठी १३ जून रोजी कोकण विभागीय पेन्शन अदालतचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११वाजता  सीबीडी बेलापूर येथील कोकण भवनमध्ये पेन्शन अदालत घेण्यात येणार आहे.

कोकण विभागात ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ,पालघर जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये वास्तव्य करणाऱ्या सेवानिवृत्त शासकीय अधिकारी व कर्मचा-यांच्या प्रलंबित प्रकरणाच्या अडचणीचे निवारण करण्यात येणार आहे. सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या पेन्श न प्रकरणांबाबतच्या तक्रारींचे अर्ज सदर दिवशी स्वीकारले जातील,असे कोकण विभागीय आयुक्तालयातर्फे कळविण्यात आले आहे.