मध्य रेल्वेचा रविवारी हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर मेगा ब्लॉक

मेन लाईनवरील मेगा ब्लॉक रद्द

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 11 फेब्रुवारी 2022

ओव्हरहेड वायर तसेच रेल्वे रुळांच्या देखभालीसाठी येत्या रविवारी 13 फेब्रुवारी रोजी मध्य रेल्वेच्या ट्रान्स-हार्बर आणि हार्बर लाईनवर मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. तर मेन लाइनवर मेगाब्लॉक नसून हार्बर आणि ट्रान्सहार्बरच्या प्रवाशांना मेन लाइन तसेच पश्चिम रेल्वेच्या मार्गांवरून प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.

  •  ठाणे-वाशी/नेरुळ अप आणि डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत

ठाणे येथून सकाळी 10.35 ते सायंकाळी 4.19 वाजेपर्यंत वाशी/नेरूळ/पनवेलसाठी डाऊन मार्गावरील सेवा आणि वाशी/नेरुळ/पनवेलहून  सकाळी 10.15 ते सायंकाळी 4.9 या वेळेत ठाण्याकरीता सुटणाऱ्या अप सेवा बंद राहतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे डाउन  हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोडला येथून सकाळी 11.16 ते सायंकाळी 4.47 या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेल करिता सुटणारी डाउन  हार्बर मार्गावरील सेवा आणि वांद्रे/गोरेगावकडे जाणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी 9.55 ते सायंकाळी 4.43 वाजेपर्यंत बंद राहतील.

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.6 ते सायंकाळी 5.13 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. 8) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.

हार्बर मार्गावरील प्रवाशांना  रविवारी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वे मार्गे प्रवास करण्याची परवानगी आहे.

  • मेन लाईनवर मेगाब्लॉक असणार नाही.

हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत.  प्रवाशांना विनंती करण्यात आली आहे की, त्यामुळे होणार्‍या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.

  • ================================================
    मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप