वाशी गावाजवळ पादचाऱ्याला भरधाव वाहनाने उडवले

  • सर्व्हिस रोड आणि सिग्नलचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
  • सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- नगरसेविका फशीबाई भगत
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई, 29 मे 2019 :

सायन- पनवेल महामार्गावर वाशी गावाजवळ एका भरधाव वाहनाने धडक दिल्यामुळे रस्ता  ओलांडणाऱ्या या पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. महामार्गाच्या विकासाचे काम सुरू असून वाशी गावालगतची सिग्नल यंत्रणा बंद आहे. त्यामुळे जीवावर उदार होऊन पादचाऱ्यांना रस्ता ओलांडावा लागतो. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनागोंदी कारभारामुळेच आज एका निष्पाप जीवाचा बळी गेला असून सार्वजनिक विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी स्थानिक नगरसेविका फशीबाई भगत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. 

सायन-पनवेल महामार्गालगत वाशी गाव येथील तिन्ही भुयारी मार्गाला जोडणारे समांतर सर्व्हिस रोडचे काम लवकरात लवकर करावे या मागणीसाठी नवी मुंबई सामाजिक पुनर्वसन संस्थेच्यावतीने संस्थेचे अध्यक्ष दशरथ भगत यांच्या नेतृत्वाखाली 27 मे रोजी वाशी गाव येथे महामार्गावर आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांना या मागण्यांबाबत निवेदनही देण्यात आले होते. मात्र त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. या आंदोलनानंतर अवघ्या दोनच दिवसांमध्ये वाशीगाव येथील रो हाऊस प्लॉट 343, सेक्टर-31A येथे राहणारे विश्वनाथ वारीयर(49) यांचा महामार्ग ओलांडताना अपघातात मृत्यु झाला. यामुळे वाशी गावातील ग्रामस्थांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

  • सायन पनवेल महामार्गावर वाशीगाव व वाशी सेक्टर 6 कडे येजा करण्यासाठी महामार्गावर  शिवशक्ती हॉटेल समोरील क्रॉसिंग साठी असलेला सिग्नल तात्काळ बसविण्यात येऊन तातडीने कार्यान्वित करावा.
  • सदर ठिकाणी क्रॉसिंग जवळ सिग्नल सह वाहतूक पोलीस नियंत्रणासाठी ठेवण्यात यावेत.
    महामार्गाच्या दोन्ही बाजूस धावपट्टीवर ये-जा करणारी भरधाव वाहनांची गती नियंत्रीत होतील असे गतिरोधक ताबडतोब बनविण्यात यावेत.
  • वाशीगाव येथील जुन्या भुयारी मार्गाचे सुशोभिकरण करून त्यामधील पादचारी मार्ग सुयोग्य करावा या मागण्या पुन्हा एकदा करण्यात आल्या आहेत.
  • या मागण्या पूर्ण न झाल्यास उग्र आंदोलन छेडावे लागेल त्याला सार्वजनिक बांधकाम विभागासह संबंधित प्रशासन जबाबदार असेल असा अ प्रासंगिक उग्र आंदोलन छेडावे लागेल त्यास PWD सह संबंधित प्रशासन जबाबदार असेल असा इशारा भगत यांनी दिला आहे.

  • सायन- पनवेल महामार्गावर रास्ता रोको आंदोलन