पनवेलमध्ये बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा

पनवेल, 15 जून 2017/AV News Bureau:

रायगड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन व पनवेल महानगरपालिका बॅडमिंटन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 24 ते 27 जून याकाळात पनवेलमध्ये रायगड जिल्हा निवड चाचणी व अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

10, 11, 13, 14, 15, 17, 19 वर्षाखालील मुले-मुली (एकेरी, दुहेरी व मिश्र) तसेच 40 वर्षावरील वेटरन्स आणि खुल्या गटात ही स्पर्धा होणार आहे.  या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलार्इन अर्ज  entry.bor@gmail.com   या र्इमेल आयडीवर 18 जून सायं. 5 वाजेपर्यंत सादर करता येणार आहेत.

या स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड करण्यात येणार असून स्पर्धेचा जास्तीत-जास्त खेलाडू  व क्रीडा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रायगड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव डेव्हिड अल्वारिस, उपाध्यक्ष शिवकुमार, पनवेल महानगरपालिका बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष परेश ठाकूर, सचिव रविंद्र भगत, उपाध्यक्ष योगेश पाटील यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी शिवकुमार(8691018584 )रविंद्र भगत(8097745670) किंवा  योगेश पाटील(7021989528) यांच्याशी संपर्क करावा, असे कळविण्यात आले आहे.