महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 22 जुलै रोजी

मुंबई,20 जून 2017/AV News Bureau:

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा -2017 (MAHATET 2017) 22 जुलै 2017 रोजी घेण्यात येणार आहे.

इयत्ता पहिली ते पाचवी आणि इयत्ता सहावी ते आठवी साठी सर्व व्यवस्थापने, सर्व मंडळे, सर्व माध्यमे, अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक / शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमत: ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असणार आहे. या परीक्षेसंबंधी सर्व शासन निर्णय, अनुषंगिक माहिती, सूचना तसेच ऑनलाईन अर्ज भरणे, अर्ज स्वीकृती, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mahatet.in  आणि www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.

  • महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा -2017 (MAHATET 2017) परीक्षेचा ऑनलाईन अर्ज आणि शुल्क भरण्याचा कालावधी15 जून 2017  ते  30 जून 2017 असा आहे.
  • प्रवेशपत्राची ऑनलाईन प्रिंट10 जुलै 2017 ते 22 जुलै 2017 या कालावधीत काढता येईल.
  • शिक्षक पात्रता परीक्षा पेपर–I  ची वेळ 22 जुलै 2017 रोजी सकाळी30 ते दुपारी 1.00 अशी आहे.
  • शिक्षक पात्रता परीक्षा पेपर–II ची वेळ 22 जुलै 2017 रोजी दुपारी00 ते 4.30 अशी असणार आहे.