शेतकरी कर्जमाफीसाठी सरकार बांधील

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन

नवी मुंबई, 19 एप्रिल 2017 /AV News Bureau:

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकारकडून शेतक-यांना कर्जमाफी देण्यासाठी सध्या पूर्वतयारी सुरू आहे. कर्जमाफीसाठी सरकार बांधील आहे. सरकारने कर्जमाफी केली तर सरसकट कर्जमाफी केली जाणार असल्याचे आश्वासन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज नवी मुंबईत दिले.

कर्जमाफीसाठी सरकार बांधील आहे. मात्र त्याआधी शेतक-यांना स्वयंपूर्ण करण्यावर सरकारचा भर राहणार आहे.  ज्या शेतक-यांकडे कर्ज फेडण्याची क्षमता आहे त्यांना कर्जमाफी करण्याची आवश्यकता नाही असे माझे वैयक्तिक मत असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

माथाडी कामगार नेते आमदार नरेंद्र पाटील यांची सध्याची संभ्रमावस्था भाजप दूर करणार आहे. त्यांना पक्षात सन्मान दिला जाईल असही पाटील यांनी यावेळी सांगितले. यामुळे नरेंद्र पाटील लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याचे संकेत आहेत. तर ज्येष्ठ कॉंग्रेस नेते नारायण राणे यांच्या पक्ष प्रवेशाचा निर्णय भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री घेणार असल्याचेही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.