शंभर रुपयाचे नाणे लवकरच

  • भारतरत्न डॉ.एम.जी.रामचंद्रन (एमजीआर) यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 100 रुपयांचे नाणे

नवी दिल्ली, 13 सप्टेंबर 2017100 rupees coin

केंद्र सरकारने लवकरच शंभर रुपयांचे नाणे चलनात आणण्याचा निर्णय घेतला आहे. तामिळनाडूचे पूर्व मुख्यमत्री आणि साउथचे सुपरस्टार म्हणून राहिलेल्या भारतरत्न डॉ.एम.जी.रामचंद्रन (एमजीआर) यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 100 रुपयांचे नाणे चलनात आणण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याशिवाय रिझर्व्ह बॅंक एमजीआर यांच्या सन्मानार्थ 5  रुपयांचे नवीन नाणेदेखील बाजारात आणणार आहे. 100 rupees coin

  • 100 च्या नाण्याची वैशिष्ट्ये 100 rupees coin

100 रुपयांच्या या नाण्याची वैशिष्ठ्येही खास आहेत. या नाण्यावर एमजी रामचंद्रन यांचा फोटो असणार आहे. फोटोखाली Dr. M G Ramchandran birth centenary असे लिलिहिलेले असणार आहे. नाण्याच्या एका भागात अशोक स्तंभ असणार आहे. अशोक स्तंभाच्या खाली सत्यमेव जयते असा मजकूर असणार आहे. अशोक स्तंभाच्या एका बाजूला भारत तर दुसऱ्या बाजूला India असे लिहिलेले असेल. त्याच्या खाली अंकात 100 असे लिहिलेले असेल. 100 रुपयांच्या या नाण्याची गोलाई 44 मिली मीटर इतकी असणार आहे. या नाण्यामध्ये 50 टक्के चांदी, 40 टक्के तांबा आणि प्रत्येकी 5 टक्के निकेल आणि जस्त हे धातू असणार आहेत. 100 रुपयांच्या नाण्याचे वजन 35 ग्रॅम इतके असणार आहे.

  • पाच रुपयांच्या नाण्याची वैशिष्ठ्ये 

5 रुपयाच्या नाण्याचा व्यास 23 मिलीमीटर इतका असणार आहे तर वजन 6 ग्रॅम इतके असेल. या नाण्यामध्ये 75 टक्के कॉपर 20 टक्के जिंक आणि 5 टक्के निकेल असणार आहे. नाण्याच्या एका भागात अशोक स्तंभ असणार आहे. अशोक स्तंभाच्या खाली सत्यमेव जयते असा मजकूर असणार आहे. अशोक स्तंभाच्या एका बाजूला भारत तर दुसऱ्या बाजूला India असे लिहिलेले असेल. त्याच्या खाली अंकात 5 असे लिहिलेले असेल. या नाण्यावर एमजी रामचंद्रन यांचा फोटो असणार आहे. त्या फोटोखाली 1917 ते 2017 असे लिहिलेले असेल.

डॉ एमजी राममचंद्रन यांच्याविषयी

डॉ एमजी राममचंद्रन यांचा जन्म 17 जानेवारी 1917 रोजी श्रीलंकेत झाला. 1972 मध्ये त्यांनी AIADMK पक्षाची स्थापना केली. 1977 ते 1987 या काळात तीन वेळा त्यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे सांभाळली होती. राजकारणात येण्याआधी त्यांनी दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये आपली अमीट छाप सोडली होती. एमआजीआर यांनीच पूर्व मुख्यमंत्री जयललिता यांनाही राजकारणात आणले होते. 1988 साली डॉ एमजी राममचंद्रन यांना सर्वोच्च भारत रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.