कोविड नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी लग्न समारंभाना दंड

प्रत्येकी 50 हजार दंडाची वसुली

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 15 डिसेंबर 2021 :

शासनाने जाहीर केलेल्या कोविड प्रतिबंधात्मक नियमावलीनुसार लग्न समारंभाकरिता असलेल्या उपस्थितीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महापालिकेच्या विशेष दक्षता पथकाने  नेरूळमधल्या 2 लग्न समारंभाना दंड आकारत त्यांच्याकडून प्रत्येकी 50 हजार रूपये याप्रमाणे 1 लाखांचा दंड वसूल केला आहे.

नेरुळ जिमखाना तसेच सेक्टर 21 नेरुळ येथील हावरे मॉलमधील सभागृह या ठिकाणी विशेष दक्षता पथकाने दंडात्मक कारवाई करीत प्रत्येकी 50 हजार याप्रमाणे 1 लाख दंडात्मक रक्कमेची वसूली केली आहे.

ओमायक्रॉन व्हेरियंटचा धोका लक्षात घेऊन कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार टेस्टींगमध्ये वाढ, लसीकरणाचे दोन्ही डोस जलद गतीने पूर्ण कऱण्यावर भर दिला आहे. त्याचप्रमाणे कोविड लसीकरण झाले असले तरी कोविडची लागण होण्यापासून वाचण्यासाठी मास्क वापरणे अनिवार्य असल्याचे लक्षात घेत मास्क न वापरता सामाजिक आरोग्याला धोका  पोहचविणा-या बेजबाबदार नागरिकांविरुध्द दंडात्मक कारवाया तीव्र स्वरुपात राबविण्यास सुरुवात केलेली आहे.

कोविड प्रतिबंधात्मक नियमावलीनुसार लग्न समारंभाकरिता बंदिस्त सभागृहात सभागृहाच्या क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीस व खुल्या जागांमधील लग्न समारंभास जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के उपस्थितीस परवानगी देण्यात आलेली आहे. या नियमांचे उल्लंघन करणा-या या दोन लग्नांवर कारवाई करण्यात आली आहे.

=======================================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप