भंडारा गोंदियामध्ये भाजपा उमेदवाराला रिपाइंचा पाठिंबा

अविरत वाटचाल न्यूज

मुंबई, 16 मे 2018: 

भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हेमंत पटले यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) तर्फे पाठिंबा देण्यात आला आहे. रिपाइं (ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी हा निर्णय घेतला आहे.

रिपाइं (ए) प्रदेशाध्यक्ष भुपेश थुलकर यांनी या विषयी भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांना पाठविलेल्या पत्राद्वारे ही माहिती दिल्याचे भाजप कार्यालयातून सांगण्यात आले  आहे.

आठवले यांच्या निर्देशानुसार पक्षाने भाजपा उमेदवाराला पाठिंब्याचा निर्णय घेतला असून पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्याप्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत, असेही थुलकर यांनी नमूद केल्याचे सांगण्यात आले आहे.