ठाण्यात पुनर्वसनानंतर चाळींवर कारवाई

ठाणे पालिका आयुक्तांचे रहिवाशांनी मानले आभार

ठाणे, 21 एप्रिल 2017/AV News Bureau:

ठाणे महानगरपालिकेच्यावतीने कळवा खाडीवर उभारण्यात येणा-या पुलामुळे बाधित होणा-या शास्त्रीनगर आणि जानकीनगर परिसरातील जवळपास 289 चाळींवर आज महापालिकेच्यावतीने कारवाई करण्यात आली. मात्र ही कारवाई करण्यापूर्वी या चाळींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचे  आधी पुनर्वसन करण्यात आले. त्यानंतरच ही कारवाई करण्यात आल्यामुळे स्थानिक रहिवाशांनी
ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांचे आभार मानले.

कळवा येथील खाडीपुलावर ठाणे महानगरपालिकेच्यावतीने पुल बांधण्याचे प्रस्तावित असून त्या पुलाच्या बांधकामामध्ये शास्त्रीनगर आणि जानकीनगर या परिसरातील जवळपास 289 चाळी बाधित होत होत्या. त्या सर्वांचे पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावल्यानंतरच तेथे कारवाई करावी ही महापालिका आयुक्तांची भूमिका होती. त्यामुळे त्यांनी तेथील बाधितांचे आधी पुनर्वसन केले आणि त्यानंतर आज त्या चाळींवर आज कारावाई केली.

या कारवाईमध्ये बाधित होणा-या शास्त्रीनगरमधील 240 कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. या बाधीत कुटुंबांना बीएसयुपी आणि रेंटलमध्ये सदनिका देण्यात आल्या. त्याचबरोबर मानवतेच्या दृष्टीकोनातून जानकीनगर येथील सुमारे 35 कुटुंबांचेही पुनर्वसन करण्याच निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतल्यामुळे रहिवाशांनी त्यांना धन्यवाद दिले.