बालकांच्या आरोग्यासाठी इंद्रधनुष मोहीम

नवी मुंबई, 12 सप्टेंबर 2017/AV News Bureau:indradhanush yojana for kids

बालकांमधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत ऑक्टोबर 2017 ते जानेवारी 2018 या कालावधीत विशेष मिशन इंद्रधनुषच्या चार अभियानांचे नियोजन करण्यात येत आहे.indradhanush yojana for kids

  • नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात आढळून आल्याप्रमाणे अर्धवट लसीकरण झालेली तसेच लसीकरण न झालेली बालके ही पूर्ण लसीकरण झालेल्या बालकांपेक्षा लवकर आजारी पडतात किंवा मृत्यू पावतात. याकरीता या मोहिमेत लसीकरणापासून पूर्णपणे वंचित राहिलेल्या किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांचे लसीकरण पूर्ण करावयाचे आहे.

 

  • विशेष मिशन इंद्रधनुष अभियानाचे उद्दीष्ट 0 ते 2 वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला डयू लिस्ट प्रमाणे नियमित लसीकरण करुन नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत डिसेंबर 2018 पर्यंत पूर्ण संरक्षित बालकांचे प्रमाण 90% पेक्षा जास्त करणे व यामध्ये प्रत्येक बालक पूर्ण संरक्षित होण्यासाठी राजकीय, प्रशासकीय, आर्थिक विभाग व इतर विभागांचा सक्रिय सहभाग घेणे हे आहे.
  • हे अभियान जोखीमग्रस्त भागात राबविण्यात येत असून यामध्ये ज्या 0 ते 2 वर्षे वयोगटातील बालके व गरोदर माता यांना राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रकाप्रमाणे यापूर्वी देय असलेल्या सर्व लसींची मात्रा मिळालेली नाही अथवा सर्व असंरक्षित बालकांना व गरोदर मातांना लसीकरण करण्यात येणार आहे.

 

  • यामध्ये जोखीमग्रस्त भागाची निवड करण्यात आली असून एकूण 9,14,611 लोकसंख्येमध्ये 2,84,701 घरांमध्ये सर्व्हे करण्यात येत आहे. हे सर्वेक्षण 29 ऑगस्टपासून सुरु करण्यात आले आहे.या सर्वेक्षणामध्ये प्रत्येक घरावर स्टिकर लावण्यात येत आहे. हे अभियान  7 ऑक्टोंबरपासून रविवार व नियमित लसीकरणाचे दिवस वगळता सात दिवस राबविण्यात येणार असल्याचे नवी मुंबई महापालिका प्रशासनाने सांगितले.