पोटनिवडणूकीत भाजपच्‍या प्रतिभा गिरकर विजयी

मुंबई, 14 डिसेंबर 2017/avirat vaatchal news:

कांदिवली (पश्चिम)  प्रभाग क्र. 21  भाजप पक्षाच्‍या तत्‍कालीन नगरसेविका शैलजा गिरकर यांच्‍या निधनामुळे रिक्‍त झालेल्‍या जागेवर  काल झालेल्‍या  पोटनिवडणूकीत भारतीय जनता पक्षाच्‍या प्रतिभा गिरकर विजयी झाल्या आहेत. त्यांनी काँग्रेसच्या निलम मधाळे यांचा पराभव केला.

गरकर यांना 9 हजार 591  मते मिळाली तर काँग्रेसच्या निलम मधाळे (मकवाणा) यांना 1 हजार 984 मते मिळाली. सुमारे 229 मतदारांनी मतदानाचा नकाराधिकार (नोटाचा) वापर केला. सदर पोटनिवडणूकीची आज मतमोजणी करण्‍यात आली.

या निवडणूकीसाठी 6 हजार 631  पुरुष व 5 हजार  173 स्त्रिया‍‍ असे एकूण 11 हजार 804 मतदारांनी आपला मतदानाचा हक्‍क बजाविला होता.