होळीसाठी मध्य रेल्वेच्या कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 12 मार्च 2024
 होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. १४ मार्चपासून या गाड्या मुंबईहून कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच गोव्यापर्यंत या विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.
लोकमान्य टिळक टर्मिनस  मुंबई – थिवि साप्ताहिक वातानुकूलित विशेष (६ फेऱ्या)
01187 विशेष दि. १४.०३.२०२४, दि. २१.०३.२०२४ आणि दि. २८.०३.२०२४ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून २२.१५ वाजता सुटेल आणि थिवि येथे दुसऱ्या दिवशी ०९.५० वाजता  पोहोचेल. (३ फेऱ्या)
01188 विशेष दि. १५.०३.२०२४, दि.२२.०३.२०२४ आणि दि. २९.०३.२०२४ रोजी थिवि येथून १६.३५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ०३.४५ वाजता पोहोचेल. (३ फेऱ्या)
गाडीचे थांबे:
ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड.
डब्यांची रचना
१ प्रथम वातानुकूलित, ३ द्वितीय वातानुकूलित, १५ तृतीय वातानुकूलित, १ पॅन्ट्री कार आणि २ जनरेटर कार (२२डब्बे)

पुणे – सावंतवाडी साप्ताहिक वातानुकूलित विशेष (६  फेऱ्या)
01441 विशेष गाडी दि. १२.०३.२०२४, दि.१९.०३.२०२४ आणि दि. २६.०३.२०२४ रोजी पुणे येथून ०९.३५ वाजता सुटेल आणि सावंतवाडी येथे त्याच दिवशी २२.३० वाजता पोहोचेल. (३ फेऱ्या)
01442 विशेष दि. १३.०३.२०२४, दि.२०.०३.२०२४ आणि दि.२७.०३.२०२४ रोजी सावंतवाडी येथून २३.२५ वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी १२.१५ वाजता पोहोचेल. (३ फेऱ्या)
गाडीचे थांबे:
लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.
डब्यांची रचना
 ३ द्वितीय वातानुकूलित, १५ तृतीय वातानुकूलित, १ गार्डस् ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार (२० डब्बे)

 पनवेल – सावंतवाडी साप्ताहिक वातानुकूलित विशेष (६  फेऱ्या)
01443 विशेष दि. १३.०३.२०२४, दि. २०.०३.२०२४ आणि दि.२७.०३.२०२४ रोजी पनवेल येथून ०९.४० वाजता सुटेल आणि सावंतवाडी येथे त्याच दिवशी २०.०५ वाजता पोहोचेल. (३ फेऱ्या)
01444 विशेष गाडी दि. १२.०३.२०२४, दि. १९.०३.२०२४ आणि दि.२६.०३.२०२४ रोजी सावंतवाडी येथून २३.२५ वाजता सुटेल आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी ०८.४० वाजता पोहोचेल. (३ फेऱ्या)
गाडीचे थांबे:
रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.
डब्यांची रचना:
३ द्वितीय वातानुकूलित, १५ तृतीय वातानुकूलित, १ गार्डस् ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार (२० डब्बे)

लोकमान्य टिळक टर्मिनस  मुंबई – थिवि साप्ताहिक विशेष (६  फेऱ्या)
01107 विशेष दि. १५.०३.२०२४, दि. २२.०३.२०२४ आणि दि.२९.०३.२०२४ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून २२.१५ वाजता सुटेल आणि थिवि येथे दुसऱ्या दिवशी ०९.५० वाजता पोहोचेल. (३ फेऱ्या)
01108 विशेष दि. १७.०३.२०२४, दि.२४.०३.२०२४ आणि दि. ३१.०३.२०२४ रोजी थिवि येथून ११.०० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे त्याच दिवशी २३.५५ वाजता पोहोचेल. (३ फेऱ्या)
गाडीचे थांबे:
ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड.
डब्यांची रचना:
१ प्रथम वातानुकूलित, १ प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, १ द्वितीय वातानुकूलित, ५ तृतीय वातानुकूलित आणि २ लगेजसह   गार्डस् ब्रेक व्हॅन आणि १० सामान्य द्वितीय श्रेणी (१८ डब्बे)

पनवेल – थिवि साप्ताहिक विशेष (६ फेर्‍या)
01109 विशेष दि. १६.०३.२०२४, दि.२३.०३.२०२४ आणि दि.३०.०३.२०२४ रोजी पनवेल येथून २३.५५ वाजता सुटेल आणि थिवि येथे दुसऱ्या दिवशी ०९.५० वाजता पोहोचेल. (३ फेर्‍या)
01110 विशेष दि. १६.०३.२०२४, दि.२३.०३.२०२४ आणि दि. ३०.०३.२०२४ रोजी थिवि येथून ११.०० वाजता सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी २२.१५ वाजता पोहोचेल. (३ फेर्‍या)
गाडीचे थांबे:
रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड.
डब्यांची संरचना:
१ प्रथम वातानुकूलित, १ प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, १ द्वितीय वातानुकूलित, ५ तृतीय वातानुकूलित आणि २ लगेजसह  गार्डस् ब्रेक व्हॅन आणि १० सामान्य द्वितीय श्रेणी (१८ डब्बे)

पुणे – थिवि साप्ताहिक विशेष (८ फेर्‍या)
01445 विशेष दि. ०८.०३.२०२४, दि. १५.०३.२०२४, दि.२२.०३.२०२४ आणि दि. २९.०३.२०२४ रोजी पुणे येथून १८.४५ वाजता सुटेल आणि थिवि येथे दुसऱ्या दिवशी ०८.३० वाजता पोहोचेल. (४ फेऱ्या)
01446 विशेष दि. १०.०३.२०२४, दि. १७.०३.२०२४, दि.२४.०३.२०२४ आणि दि. ३१.०३.२०२४ रोजी थिवि येथून ०९.४५ वाजता सुटेल आणि पुणे येथे त्याच दिवशी २३.५५ वाजता पोहोचेल. (४ फेर्‍या)
गाडीचे थांबे:
लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड.
डब्यांची चना:
१ द्वितीय वातानुकूलित , ४ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान आणि २ गार्ड ब्रेक व्हॅनसह ६ सामान्य द्वितीय श्रेणी (२२ डब्बे)
पनवेल – थिवि साप्ताहिक विशेष (८ फेर्‍या)
01447 विशेष दि. ०९.०३.२०२४, दि.१६.०३.२०२४, दि.२३.०३.२०२४ ते दि.३०.०३.२०२४ रोजी पनवेल येथून २२.०० वाजता सुटेल आणि थिवि येथे दुसऱ्या दिवशी ०८.३० वाजता पोहोचेल. (४ फेऱ्या)
01448 विशेष दि. १०.०३.२०२४, दि. १७.०३.२०२४, दि.२४.०३.२०२४ आणि दि.३१.०३.२०२४ रोजी थिवि येथून ०९.४५ वाजता सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी संध्याकाळी २१.०० वाजता पोहोचेल. (४ फेर्‍या)
गाडीचे थांबे:
पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड.
डब्यांची रचना
१ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान आणि २ गार्ड ब्रेक व्हॅनसह ६ सामान्य द्वितीय श्रेणी (२२ डब्बे)

रोहा – चिपळूण अनारक्षित विशेष मेमू (२२ सेवा)
01597 मेमू ०८/०३, ०९/०३, ११/०३, १५/०३, १६/०३, १८/०३, २२/०३, २३/०३, २५/०३, २९/०३, ३०/०३ रोजी रोहा येथून ११.०५ वाजता सुटेल  आणि चिपळूण येथे त्याच दिवशी   १३.३० वाजता पोहोचेल. (११ फेर्‍या)
01598 मेमू विशेष ०८/०३/२०२४, ०९/०३, ११/०३, १५/०३, १६/०३, १८/०३, २२/०३, २३/०३, २५/०३, २९/०३ आणि ३०/०३/२०२४ रोजी चिपळूण येथून १३.४५ वाजता सुटेल आणि रोहा येथे त्याच दिवशी १६.१० वाजता पोहोचेल. (११ फेऱ्या)
गाडीचे थांबे:
कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखौटी, कळंबणी, खेड आणि अंजनी.
डब्यांची रचना:
१२ कार मेमू
या होळीनिमित्त सोडण्यात आलेल्या विशेष गाड्यांचे आरक्षण विशेष बुकींग शुल्कासह १० मार्चपासून सुरु झाले आहे.
या विशेष ट्रेन्सच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
========================================================

========================================================