सांस्कृतिक प्रतिभा खोज शिष्यवृत्तीसाठी 31 जानेवारीपर्यंत अर्ज

  • नवी मुंबई महापालिकेचे शाळांना आवाहन

नवी मुंबई, 8 जानेवारी 2017/avirat vaatchal news:

सांस्कृतिक स्त्रोत एवं प्रशिक्षण केंद्रातर्फे सांस्कृतिक प्रतिभा खोज छात्रवृत्ती योजना 2018-19 साठी अर्ज मागविण्यांत आले असून 31 जानेवारीपर्यंत इच्छुकांनी आपले अर्ज नवी दिल्ली सांस्कृतिक स्त्रोत एवं प्रशिक्षण केंद्र, नवी दिल्ली येथे ऑनलाइनपद्धतीने करावयाचे आहे.

या शिष्यवृत्तीसाठी प्रत्येकी 400 Junior & Senior fellowship देण्यात येतात. तज्ज्ञ निवड समितीमार्फत निवड झाल्यानंतर या शिष्यवृत्तीद्वारे प्रत्येक विद्यार्थ्याला दरमहा ज्युनियर फेलाशिप 10,000 रुपये  आणि सिनियर फेलोशिप 20,000 रुपये इतके मानधन मिळते.

 

प्रति वर्षी राष्ट्रीय स्तरावर एकूण 650 शिष्यवृत्ती देण्यात येतात.

  • 100 शिष्यवृत्ती या अनुसुचित जाती/जमाती
  • 20 दिव्यांग मुलांसाठी
  • 30 शिष्यवृत्ती लेखन साहित्य कला क्षेत्रात कार्यरत विदयार्थ्यांना
  • 125 शिष्यवृत्ती पारंपारिक कलेचा वारसा असलेल्या मुलांना
  • 375 शिष्यवृत्ती इतर वर्गातील विदयार्थ्यांसाठी

 

अधिक माहिती सांस्कृतिक स्त्रोत एवं प्रशिक्षण केंद्र यांच्या www.ccrtindia.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

  • सर्व अर्जांची छाननी केंद्रीय तज्ञ समितीकडून केली जाते.
  • एका वेळेस एका संस्थेतील तीन मुलेच अर्ज करु शकतात.
  • अर्जदार मात्र एका विषयासाठी अर्ज भरु शकतात.
  • एका पेक्षा जास्त विषयासाठी अर्ज करणारे विदयार्थी प्रथम फेरीत बाद केले जातील.
  • सांस्कृतिक स्त्रोत एवं प्रशिक्षण केंद्र, नवी दिल्ली येथे अर्ज भरणेपूर्वी ते सर्वार्थाने पुर्ण आहेत याची खात्री करुनच पाठविण्यात यावे.

 

नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या खाजगी प्राथमिक तसेच माध्यमिक शाळेतील विदयार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, जास्तीत जास्त विदयार्थ्यांनी सदर शिष्यवृत्तीचे अर्ज दिनांक 31 जानेवारी 2018 पुर्वी भरणेबाबत उचित कार्यवाही करावी.