नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासंदर्भात तीन सामंजस्य करार

 मुंबई, 8 जानेवारी 2018/avirat vaatchal news:

नवी मुंबई विमानतळाच्या कामाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सिडको व मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रा. लिमिटेडच्या नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट सोबत तीन महत्वताचे करार करण्यात आले. threee agreement for navi mumbai airport 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी भागीदार कंपनी म्हणून मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रा. लि. यांची निवड झाली आहे. या कंपनीबरोबर मिळून सिडको व इतर भागीदार यांनी  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रा. लिमिटेड या विशेष उद्देश वहन कंपनीची (एसपीव्ही) स्थापना करण्यात आली.

या कंपनीबरोबर आज सवलत करारनामा, राज्य शासनाचा पाठिंब्याचा करार व भागधारकांचा करार आदी तीन महत्त्वाचे करार करण्यात आले. यावेळी सिडकोच्यावतीने व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कंपनीतर्फे जीव्हीके कंपनीचे प्रमुख जीव्हीके रेड्डी यांनी करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठीच्या सर्व परवानगी मिळाल्या आहेत. विमानतळ गाभा क्षेत्रातील भू विकास कामांना सुरूवात झाली आहे. या विमानतळामुळे सुमारे प्रतिवर्ष एक कोटी प्रवासी क्षमतेची व 0.26 दशलक्ष टन मालवाहतूक क्षमता निर्माण होणार असून त्याचा पहिला टप्पा डिसेंबर 2019 पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.