कोपरखैरणे येथे दैनंदिन बाजारासाठी इमारत

नवी मुंबई, 16 फेब्रुवारी 2018/अविरत वाटचाल न्यूज:

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सेक्टर 3 कोपरखैरणे मध्ये भू.क्र. 36 येथे 928.36 चौ.मी. क्षेत्रफळात दैनंदिन बाजार इमारत बांधण्यात आली आहे. या अद्ययावत बाजार इमारतीचे उद्घाटन नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांच्याहस्ते करण्यात आले.

 

यावेळी ऐरोली विधानसभा सदस्य आमदार  संदीप नाईक, उपमहापौर  मंदाकिनी म्हात्रे, स्थायी समिती सभापती  शुभांगी पाटील, सभागृह नेते रविंद्र इथापे, परिवहन समितीचे सभापती प्रदीप गवस, इ प्रभाग समिती अध्यक्ष तथा स्थानिक नगरसेविका संगीता म्हात्रे, समाजकल्याण व झोपडपट्टी सुधार समिती सभापती अनिता मानवतकर, नगरसेवक शंकर मोरे, शशिकला पाटील, सायली शिंदे, छाया म्हात्रे, मेघाली राऊत, लता मढवी, सहा. आयुक्त अशोक मढवी, माजी नगरसेवक केशव म्हात्रे, इ प्रभाग समिती सदस्य प्रतिक तांबे, मारुती सकपाळ, गिरीश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

 

  • कोपरखैरणे येथे नागरिकांच्या सुविधेसाठी अद्ययावत दैनंदिन बाजार उपलब्ध होत असून त्याठिकाणी 95 विक्रेत्यांची सोय होणार आहे. विक्रेत्यांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णत: टाळावा व स्वच्छ शहराचा आपल्या नवी मुंबई शहराचा नावलौकीक टिकविण्यासाठी बाजारात स्वच्छता कशी राहील याकडे विशेष लक्ष द्यावे असे आवाहन महापौर सुतार यांनी यावेळी केले.

 

  • नागरी सेवांसाठीचे भूखंड सिडको व इतर प्राधिकरणांनी महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करणेबाबत शासन स्तरावर आपण सातत्याने पाठपुरावा करी आहोत. कोपरखैरणेतील नागरिकांसाठी एक प्रशस्त व सुनियोजित दैनंदिन बाजार उपलब्ध होत असल्याबद्दल आमदार संदीप नाईक यांनी समाधान व्यक्त केले. दैनंदिन बाजार इमारतीस कोपरखैरणे विभागातील समाज सेवक कै. सुरेश काशिनाथ म्हात्रे अशा सेवाभावी वृत्तीच्या व्यक्तीचे नामकरण केल्याबद्दल त्यांनी महापौर व सर्व महानगरगपालिका सदस्यांचे अभिनंदन केले.

2 कोटी 99 लक्ष रक्कम खर्च करून सेक्टर 3 कोपरखैरणे येथील भू.क्र. 36 वर बांधण्यात आलेल्या या मोठ्या आकाराच्या दैनंदिन बाजारात 68 भाजीपाला विक्रीचे तसेच 27 मासळी विक्रीचे ओटले असून यामुळे येथील नागरिकांची चांगली सोय होणार आहे.