दिघा-तुर्भे-बेलापूर, वाशी-घणसोली-महापे मेट्रो

  • नवी मुंबईत मेट्रोचे जाळे उभारण्याची शिफारस

मुंबई, 20 मार्च 2018/ अविरत वाटचाल न्यूज:

नवी मुंबई शहरात बहुपर्यायी परिवहन व्यवस्थेची शक्यता पडताळण्यासाठी सिडकोद्वारे नियुक्त दिल्ली मेट्रो रेल्वे कार्पोरेशनने सादर केलेल्या शिफारशींमध्ये बेलापूर-तळोजा-कळंबोली-खांदेश्वर या मार्गासोबतच नवी मुंबई महापालिका हद्दीत दिघा-तुर्भे-बेलापूर आणि वाशी-घणसोली-महापे या मेट्रो मार्गाचाही समावेश केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत लेखी उत्तरातून दिली.

आमदार संदीप नाईक, जितेंद्र आव्हाड आणि अन्य सदस्यांनी नवी मुंबईत मेट्रो प्रकल्प राबविण्याबाबत तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता.

  • या प्रश्नावर मुख्यमत्र्यांनी आपल्या लेखी उत्तरात स्पष्ट केले की, दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाने तयार केलेल्या शिफारशीनुसार मार्गिका क्रमांक 1 अंतर्गत येणाऱ्या बेलापूर-खारघर-पेंधर-तळोजा-एमआयडीसी-कळंबोली-खांदेश्वर आणि त्यापुढे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मार्गावरील बेलापूर ते पेंधर या उन्नत मार्गाचे काम हाती घेण्यात आलेले आहे.
  • याशिवाय नवी मुंबईतही मेट्रो प्रकल्प राबविण्याची शिफारस करण्यात आली आहे. दिघा, ऐरोली,रबाळे, घणसोली,कोपरखैरणे,वाशी अशा मार्गांचा समावेश करण्यात यावा यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी जून 2017 च्या काळात राज्य शासनाला निवेदन देण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या फेर सर्वेक्षणाचे काम आयआयटी मुंबई यांना देण्यात आले होते.त्यानी 21 जानेवारी 2014 मध्ये आपला अहवाल सादर केलेला आहे. सध्या त्या अहवालावर अंतिम निर्णय घेण्याची बाब विचाराधीन असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या लेखी उत्तरात नमूद केले आहे.