नवी मुंबईत १० एप्रिल रोजी पाणी पुरवठा बंद

पाणी पुरवठा विभागाकडून  जलवाहिनीच्या देखभाल दुरूस्तीचे काम 

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • 6 एप्रिल 2023

 नवी मुंबई महानगरपालिकेची मुख्य जलवाहिनी चिखले येथे पनवेल-कर्जत दुहेरी रेल्वे मार्गाकरिता स्थलांतरीत करणे व कळंबोली येथे एक्स्प्रेस वे पुलाखाली दिवा-पनवेल रेल्वे लाईन क्रॉसिंग करुन जलवाहिनी टाकणेसाठी आवश्यक कामे करण्यात येणार आहेत. तसेच भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र, मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीवर देखभाल – दुरुस्तीची व इतर कामे करणे आवश्यक आहे. त्यामुळे 10 एप्रिल  रोजी, सकाळी 10 ते दुस-या दिवशी 11 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातुन होणारा पाणी पुरवठा 24 तासांकरीता बंद (Shut Down) ठेवणे गरजेचे आहे.

या दुरूस्तीच्या कामासाठी 10 एप्रिल  रोजी संध्याकाळचा आणि 11 एप्रिल रोजी सकाळचा पाणी पुरवठा बंद राहील. तसेच 11 एप्रिल  रोजी संध्याकाळचा पाणी  पुरवठा टप्प्याटप्प्याने कमी दाबाने सुरू होईल.

 नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील तसेच कामोठे, खारघर नोडमधील नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की, या कालावधीसाठी आवश्यक असलेला पाण्याचा साठा करून ठेवावा. तसेच या कालावधीत पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करुन नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे.

========================================================

अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL

==================================================

अविरत वाटचाल वर्तमानपत्र