सात स्थायी समिती सदस्यांची निवड

 

अविरत वाटचाल

नवी मुंबई , 18 एप्रिल 2018:

नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यांमधील आठ सदस्य मे महिन्यात निवृत्त होणार आहेत. त्यामुळे रिक्त होणा-या यामधील सात पदांसाठी नवीन सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. तर स्थायी समिती सभापतीपदासाठी मे महिन्यात निवड प्रक्रिया पार पडणार आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 20 (3 व 4) अन्वये स्थायी समितीचे 8 सदस्य 1 मे 2018 रोजी निवृत्त होत आहेत. त्या जागी आज सर्वसाधारण सभेमध्ये डॉ. जयाजी नाथ, नविन गवते, ॲड. भारती पाटील, मनिषा भोईर, दिव्या गायकवाड, पुनम पाटील, सुनिल पाटील या सात सदस्यांची नामनिर्देशनाव्दारे स्थायी समिती सदस्यपदी नियुक्ती झाल्याचे घोषित करण्यात आले. महापौर जयवंत सुतार, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी नवनियुक्त सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

लक्ष्मीकांत नामदेव पाटील, अशोक गुरखे, मीरा पाटील, छाया म्हात्रे, संगीता पाटील, प्रशांत पाटील, दिपक पवार हे सदस्य स्थायी समितीमधून निवृत्त झाले.