कसळखंड ग्रामपंचायतमधील शेकाप कार्यकर्ते काँग्रेसमध्ये

अविरत वाटचाल न्यूज

पनवेल, 16 मे 2018:

आगामी ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी आघाडीच्या युत्या होत असताना कसळखंड ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणुका लढवीत आहे. या ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस ७ जागेवर सदस्यासाठी उमेदवार तसेच सरपंच पदासाठी उमेदवार उभे केले आहे. या ग्रामपंचायतीमधील  कॉंगेसचे प्रमुख नेते व तालुका उपाध्यक्ष अनंत बुवा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आरीवलीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते भगवान काशिनाथ पाटील व त्यांच्या सहकार्यानी रायगड जिल्हा अध्यक्ष आर. सी. घरत यांच्या उपस्थितीत कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.

या वेळी पनवेल शहर कॉंग्रेस अध्यक्ष सुदाम पाटील, महाराष्ट्र प्रदेश महिला सरचिटणीस निर्मला म्हात्रे, पनवेल विधानसभा युवक अध्यक्ष हेमराज म्हात्रे उपस्थित होते या वेळी कसळखंड ग्रामपंचायतीमधील आरीवले, आष्टे, शिवाजीनगर व कसळखंड या गावांमधील भगवान पाटील (आरीवली मा. सरपंच), महादेव पाटील, चंद्रकांत गोजे, अनंता गोजे, पुंडलिक गोजे, सदानंद गोजे, नरेश राउत, किशोर पाटील, केतन पाटील, शेवंताबाई गोजे, प्रभावती पाटील, प्रभाकर पाटील, समीर गोजे, उमेश पाटील (आष्टे), दिनेश पाटील, दीपक कांबळे, महेश पाटील, जयेश पाटीलमहेश चंद्रकांत पाटील व अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. या वेळी कॉंग्रेसचे दामोदर पाटील, चेतन पाटील, कमलाकर घरत, ओमकार पाटील, प्रल्हाद पाटील, दीपक बरवी, हेमंत खैरे, शंतनू घरत उपस्थित होते.