10 वी नंतरचा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रियेत बदल

  • उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे

अविरत वाटचाल न्यूज

नागपूर, 5 जुलै 2018 :

दहावी उत्तीर्ण झालेल्यांसाठी व्यावसायिक पदविका अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया  प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या कक्षेतून वगळण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधान सभेत निवेदनाद्वारे दिली.

  • दहावी उत्तीर्ण झालेल्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी कोणतीही सोय उपलब्ध नसल्याने त्यांना तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील व्यावसायिक पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित विचारात घेता, तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र विनाअनुदानित व्यावसायिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) अधिनियम 2015 याव्दारे स्थापन केलेल्या प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या कक्षेतून वगळण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

 

  • या पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रीया पूर्वीप्रमाणेच तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणार आहे तसेच, विविध व्यावसायिक पदविका अभ्यासक्रमांकरिता विद्यार्थ्यांना आतापर्यंत मिळत असलेले राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना व डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता या योजनांचे लाभ कायम राहतील याकरिता देखील स्वतंत्ररित्या आदेश देण्यात आल्याचेही तावडे यांनी सांगितले .

 

============================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा…

  • न्हावा शेवा-शिवडी ट्रान्सहार्बर लिंड रोड